PHOTOS :"त्या' आईला बाटलीत पेट्रोल मिळाले नसते तर...कदाचित...

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

समाजावर परिणाम करणारी एखादी घटना घडल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. माणसाच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांशी निगडित असो अथवा माणुसकीच्या कंगोऱ्यातून पाहणारी घटना असो, घटनेला कारणीभूत असलेली गोष्ट झाली नसती तर अशा प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच आहे.

नाशिक : समाजावर परिणाम करणारी एखादी घटना घडल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. माणसाच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांशी निगडित असो अथवा माणुसकीच्या कंगोऱ्यातून पाहणारी घटना असो, घटनेला कारणीभूत असलेली गोष्ट झाली नसती तर अशा प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन केले. या घटनेबाबतही अशाच चर्चा सुरू झाल्या. त्यांना जर बाटलीत पेट्रोल मिळाले नसते तर असा प्रकार घडला नसता, अशा प्रतिक्रिया उमटल्या. 

Image may contain: one or more people, tree, night and outdoor

धसका घेतलेली आई हताश झाली होती...

पंचवटीतील टकलेनगर येथील एका कुटुंबातील मुलीचे तीन वर्षांपूर्वी लग्न ठरले, त्याप्रमाणे ते मागील महिन्यात झालेदेखील. परंतु मुलीला वैवाहिक जीवनात सुख नव्हते. पतीने नमारहाण करून तिचा छळ चालविला होता. म्हणून तिने सासरहून पळ काढत नाशिक गाठले. पतीकडच्या मंडळींनी स्थानिक पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. हा प्रकार मुलीच्या आई-वडिलांना कळविला. नाशिककडे आलेली मुलगी मुंबई-आग्रा महामार्गावर उतरली आणि त्या ठिकाणापासून जवळ असलेल्या पोलिस ठाण्यात पोचली. त्या वेळी पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना बोलावून घेतले; परंतु मुलीने सासरी नव्हे, तर आपल्या माहेरी जाण्यासही नकार दिला. त्या वेळी तिला आई-वडील आणि कुटुंबातील नातेवाइकांनी तिला तिच्या मैत्रिणीकडे राहावयास जाऊ दिले.

Image may contain: motorcycle, car, outdoor and nature

त्या आईला जर बाटलीत पेट्रोल मिळाले नसते तर...

आई-वडिलांचा जीव मात्र मुलीत. तिचे काही बरे-वाईट होऊ नये म्हणून पंचवटी पोलिस ठाण्यात मुलीला बोलावून घेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने भूमिका कायम ठेवली. स्वतः नोकरी करून उदरनिर्वाह करीत मैत्रिणीकडे राहण्याच्या तिच्या निर्णयावर ठाम होती. या घटनेमुळे समाजात नाचक्की होईल म्हणून धसका घेतलेली आई हताश झाली होती. त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर येऊन दुचाकीच्या डिकीत ठेवलेली पेट्रोलची बाटली काढून अंगावर ओतून स्वतःस पेटवून घेतले. या घटनेत त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 11) मृत्यू झाला. त्या आईला जर बाटलीत पेट्रोल मिळाले नसते तर... ही घटना घडली नसती याची एकच चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

Image may contain: shoes and outdoor

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman burn in front of panchavati police station Nashik Marathi News