PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

राजेंद्र अंकार : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

सिन्नरमध्ये ह्रदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अडीज वर्षाच्या तान्ह्या मुलाची आई स्वयंपाक घरात जेवण बनवायला गेली आणि तिला काळाने गाठले. बोलता येत नसले तरी तो आपल्या आईला शोधतोय.. कारण त्याची आई आता त्याला कुठेच दिसत नाहीए.

नाशिक : सिन्नरमध्ये ह्रदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अडीज वर्षाच्या तान्ह्या मुलाची आई स्वयंपाक घरात जेवण बनवायला गेली आणि तिला काळाने गाठले. बोलता येत नसले तरी तो आपल्या आईला शोधतोय.. कारण त्याची आई आता त्याला कुठेच दिसत नाहीए.

Image may contain: 1 person, smiling, selfie and closeup

अशी घडली घटना...

सोमवार (ता.२७) सिन्नर शहरातील राजा फत्तेसिंह रोड परिसरात राहणाऱ्या चव्हाण यांच्या परिवारात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंदच हिरावला आहे. शिवानी वैभव चव्हाण (वय२५) असे विवाहीतेचे नाव असून सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्वयंपाकघरात गॅसवर लावलेला कुकर बघण्यासाठी गेली.. यावेळी अचानक कुकरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, कुकरचे भांडे शिवानी यांच्या डोक्यावर जोरात येऊन आदळला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने कानातुन व नाकातुन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. घटना घडताच पती वैभव व मोठा दीर विशाल चव्हाण यांनी तात्काळ शहरातील खाजगी दवाखान्यात शिवानीला दाखल केले. परंतु जखम गंभीर असल्याने नाशिकला हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच शिवानी हिचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा >'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

"आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला
शिवानीला अडीज महिन्याचा मुलगा अथांग चव्हाण असल्याचे समजते. बाळ लहान असल्याने अन् अचानक त्याची आई देवाने हिरावून घेतल्याने तो सारखा आईला शोधतोय..सध्या त्याचा सांभाळ त्याचे आजी आजोबा म्हणजेच शिवानीचे सासू- सासरे करत असल्याचे समजत आहे. काहीही असो पण अडीच महीन्याचा चिमुकला अथांग आता आईच्या प्रेमाला पारखा झाला.

हेही वाचा > आईच निघाली उलट्या काळजाची..शेवटी मुलाने संतापात..​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies in cooker explosion at Sinner Nashik Marathi News