कौटुंबिक भांडणाने त्रस्त महिलेवर लिफ्टच्या बहाण्याने अत्याचार; अंगावर काटा आणणारी घटना

woman standing on road.jpg
woman standing on road.jpg

नाशिक / सिन्नर : सायंकाळी पाचच्या सुमारास ही महिला शिर्डी महामार्गावरील गावाबाहेर वाहनाच्या प्रतीक्षेत उभी होती. कौटुंबिक भांडणामुळे ती मुलासह सिन्नरला नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाली होती. त्या वेळी शिर्डीकडून येत असलेल्या आयशर टेम्पोचालकाने या महिलेला सिन्नरपर्यंत सोडण्याची तयारी दाखवली. यानंतर जे काही घडलं ते अंगावर काटा आणणारे होते.

रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी थांबविले वाहन

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही महिला शिर्डी महामार्गावरील गावाबाहेर वाहनाच्या प्रतीक्षेत उभी होती. कौटुंबिक भांडणामुळे ती मुलासह सिन्नरला नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाली होती. त्या वेळी शिर्डीकडून येत असलेल्या आयशर टेम्पोचालकाने या महिलेला सिन्नरपर्यंत सोडण्याची तयारी दाखवली. मात्र, वाटेत तिला झोप लागल्याने चालकाने टेम्पो सिन्नरला न थांबवता नाशिकच्या दिशेने पुढे नेला. मोह शिवारात आल्यावर महिलेला जाग आली, तेव्हा तिने पुढे एखाद्या ढाब्यावर सोडण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिला व रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी वाहन थांबवत अत्याचार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

अत्याचारामुळे महिलेस रक्तस्राव होत होता

दरम्यान, वाहनचालकाने तेथून टेम्पो माघारी फिरवत महिलेला सिन्नर बसस्थानक परिसरात सोडले व पसार झाला. मात्र, त्याने केलेल्या अत्याचारामुळे महिलेस रक्तस्राव होत होता. तशाही अवस्थेत ती मुलासोबत बसस्थानकातील बँकेसमोर बसून होती. ही बाब तेथे असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. मात्र, त्यांना आपबिती सांगण्याऐवजी महिलेने उशीर झाल्याने इथे थांबल्याचे सांगितले. अंधार पडू लागल्याने एका कार्यकर्त्याने सिन्नर पोलिस ठाण्यात फोनवरून माहिती देत मदत पाठवण्याची विंनती केली. परंतु अर्धा तास उलटूनही एकही पोलिस कर्मचारी बसस्थानकाकडे फिरकला नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी महिलेची विचारपूस करत एका नातेवाइकास बोलावून घेतले व ते निघून गेले. नातेवाइकांकडे आल्यानंतर या महिलेने घरातील महिलेस आपबिती सांगितली. तिथे अंघोळ केल्यानंतरही रक्तस्राव थांबत नसल्याने नातेवाइकांनी रात्री उशिरा तिला खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले. तेथून सिन्नर पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती देण्यात आली. गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवून घेत अज्ञात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. 

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शिर्डी महामार्गावरील गावातून पाचवर्षीय बालकासोबत सिन्नरला जाण्यासाठी निघालेल्या ३५ वर्षीय विवाहितेला लिफ्ट देत आयशर टेम्पोचालकाने तिच्यावर वाहनातच अत्याचार केला. बुधवारी (ता.१२) सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील मोह शिवारात हा प्रकार घडला. रक्तस्राव झाल्याने संबंधित महिला खासगी दवाखान्यात गेल्यावर पोलिसांना ही बाब कळविण्यात आली.या प्रकरणी गुरुवारी (ता.१३) अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com