लेडी सिंघम लय भारी! ७० बेपत्ता महिलांना शोधण्यात यश; महिन्यात ५०० गुन्ह्यांचा निपटारा 

lady police at night.jpg
lady police at night.jpg

नाशिक : बेपत्ता तब्बल ७० महिलांच्या तपासात नेत्रदीपक कामगिरी करताना काही महिला अधिकाऱ्यांनी नेपाळपर्यंत संशयितांचा पाठलाग केला. 
नाशिक शहरात डिसेंबरमध्ये पोलिस आयुक्तांनी महिला अत्याचाराच्या गुन्हे तपासाचे उद्दिष्ट दिले होते.

७० बेपत्ता महिलांना शोधण्यात यश; महिन्यात ५०० गुन्ह्यांचा निपटारा 

शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडल एकमधील सहा पोलिस ठाण्यातील महिलावरील अत्याचार, विनयभंग, टवाळखोरीसह कौटुंबिक वादाच्या आणि बेपत्ता महिलांच्या शोधासारख्या संवेदनशील गुन्ह्यासह प्रलंबित ५०० गुन्ह्यांच्या तपासात चमकदार कामगिरी केल्याबद्दल पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते महिला पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा सत्कार झाला. 

तब्बल ५०० गुन्हे उघडकीस आणले.
बेपत्ता तब्बल ७० महिलांच्या तपासात नेत्रदीपक कामगिरी करताना काही महिला अधिकाऱ्यांनी नेपाळपर्यंत संशयितांचा पाठलाग केला. 
नाशिक शहरात डिसेंबरमध्ये पोलिस आयुक्तांनी महिला अत्याचाराच्या गुन्हे तपासाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाही पोलिस ठाण्यांतील महिला अधिकाऱ्यांनी एक हजार चारपैकी तब्बल ५०० गुन्हे उघडकीस आणले. विनयभंग (१४), अत्याचार (तीन), कौटुंबिक अत्याचार (३७), बेपत्ताचे २० गुन्हे उघडकीस आणले. यात १७ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महिलांच्या गतिमान कामकाजाबद्दल पोलिस आयुक्तांनी सन्मानपत्र देऊन महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांना गौरविले. 

महिलांच्या छे़डछा़ड प्रकरणात बळाचा वापर करण्याचे निर्देश
टवाळखोरांना चोप, मावळत्या वर्षाला निरोप देतानाच महिलांच्या छे़डछा़ड प्रकरणात महिला पोलिसांना बळाचा वापर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. या सगळ्या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तांनी उपनिरीक्षक उमा गवळी, चांदनी पाटील, सी. एस. पाटील, जयक्षी अनवणे, प्रियंका गायकवाड, योगिता कोकाटे, पार्वी राठोड, क्षितिजा रेड्डी, तसेच पोलिस नाईक अनिता पाटील, सरला घोलप, ललिता वाघ, जयश्री राठोड, जयश्री कांगणे, शुभांगी आवारे, रीना आहेर, वनिता पैठणकर, सोनाली वडारकर आदींना सन्मानपत्र देऊन गौरविले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com