ग्रामपंचायत सदस्य नसतानाही महिला आरक्षण; नांदगाव तालुक्यातील पेच 

gram panchayat elections.jpg
gram panchayat elections.jpg

नांदगाव (जि.नाशिक) : ज्या गावात सरपंचपदासाठी महिलांचे आरक्षण निघाले त्या गावात कुठल्याही प्रभागातून संबंधित संवर्गातील महिलाच निवडून आलेली नसताना त्या ठिकाणी महिलांचे आरक्षण निघाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महिला आरक्षणानंतर पुरुषाला सरपंच होण्याची संधी उपलब्ध होईल. हा घोळ तांत्रिकदृष्ट्या नांदगाव तालुक्यातील वाखारी, पानेवाडी व हिंगणेदेहरे या तीन गावांतील सरपंचपदाच्या महिला सरपंच सोडतीच्या वेळी झाला. 

घोळ कशामुळे झाला, हे स्पष्ट झाले नाही
महिला सरपंचपदासाठी अनुसूचित जातीसाठी तीन, अनुसूचित जमातीसाठी सात, ओबीसीसाठी १२, तर सर्वसाधारण वर्गासाठी २३ याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यातील अनुसूचित जमातीसाठी सातपैकी वाखारी, पानेवाडी व हिंगणेदेहरे या तीन गावांतील सरपंचपदासाठी महिलांचे आरक्षण घोषित झाले. प्रत्यक्षात मात्र या गावातील निवडून आलेल्या उमेदवारात सरपंचपदासाठी संबंधित संवर्गातील महिला उमेदवारच नसल्याचे निदर्शनास आले. हा घोळ कशामुळे झाला, हे स्पष्ट झाले नाही. प्रशासकीय गोंधळामुळे हा तांत्रिक घोळ उडाल्याचे लक्षात येताच यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविण्यासाठी नांदगावच्या यंत्रणेची धावाधाव झाली. शेवटी अधिनियम १९६४ च्या नियमातील काही तरतुदींच्या आधारामुळे यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. 

आता पुरुषांना संधी 
अधिनियम १९६४ कलम पाच नुसार, ज्या वेळी सरपंचपद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमाती यांसह) महिलांसाठी आरक्षित असेल व उक्त जाती, जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यामधील महिला व सदस्य कोणत्याही कारणाने उपलब्ध नसेल, तर सरपंचपद तेवढ्या मुदतीपुरते (१) जर मूलतः अनुसूचित जातीच्या महिलांसाठी असेल, तर अनुसूचित जातीसाठी (२) जर मूलतः अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी असेल तर अनुसूचित जमातीसाठी (३) जर मूलतः नागरिकांच्या मागासवर्गाच्या महिलांकरिता असेल तर नागरिकांच्या मागासवर्गासाठी आरक्षित असल्याचे समजण्यात येईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com