Women's Day : इच्छाशक्ती व सकारात्मकतेच्या जोरावर 'ती'ने मिळवला मृत्यूवर विजय...!

nutan.jpg
nutan.jpg

नाशिक : (ओझर) लग्न होऊन संसाराला नुकतीच सुरवात झालेली तसेच बी.एड.ची परीक्षा देऊन पंधरा दिवसांचाच कालावधी झाला होता. ऐन तारुण्याच्या व स्वप्न साकारणाऱ्या वयात (24 व्या वर्षी) पॅरालिसीससारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने 20 दिवस कोमात गेले. या जीवन- मरणाच्या लढाईत स्मरणशक्ती गेली. हाता-पायांसह शरीरातील ताकद संपली. मात्र, या परिस्थितीतही हरायचे नाही, तर लढायचे हे मनोमन ठरवून ओझर येथील नूतन गायकवाड यांनी इच्छाशक्ती व सकारात्मकतेच्या जोरावर मृत्यूवर विजय मिळवला. 

दोन वर्षांत पॅरालिसेसने आलेल्या अंपगत्वावर मात

स्मरणशक्ती गेल्याने सर्व आयुष्य जणू काही ब्लॅंक झाले होते. मुलगी केवळ दीड वर्षाची होती. तिला आईच्या मायेची गरज असतांना, आई मुलीला आणि कुटुबांलाही ओळखत नव्हती. अशा परिस्थितीतून बाहेर पडायचेच, असे मनात ठरवून रोज योगा-व्यायाम सुरू केले. व स्वत:ला सिद्ध करून दाखवायचेच. ही खूणगाठ मनाशी बांधत रोज सहा ते सात तास व्यायाम केला आणि दोन वर्षांत पॅरालिसेसने आलेल्या अंपगत्वावर मात केली. अशी परिस्थिती कोण्त्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये, यासाठी नूतन गायकवाड यांनी ओझर येथे योगाकार फिटनेस पॉइंटच्या माध्यमातून महिला व पुरुषांना सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी योग व व्यायामाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. 

महिलांना रोगमुक्त करण्याचा ध्यास

आपण जसे या आजाराला बळी पडलो तसे दुःख इतर स्त्रियांच्या वाट्याला येऊ नये यासाठी नूतन गायकवाड यांनी ओझरला फिटनेस पॉइंट सुरू केले. या माध्यमातून त्यांनी महिला व पुरुषांना सदृढ व निरोगी आरोग्यासाठी योग व व्यायामाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त केले. ज्या आजाराने व्यक्ती अंथरुणाला खिळून जाते त्या आजारातून स्वतःच्या इच्छाशक्तीने मात करीत नूतन गायकवाड यांनी ज्या योगाने आपल्याला जीवदान दिले त्याचाच प्रसार करून महिलांना निरोगी राहण्यासाठी पायवाट तयार करून दिली. त्यांची ही लढण्याची जिद्द आणि सामाजिक जाणीव ही समाजाला खरोखर प्रेरणादायी अशीच आहे. ओझर येथील असलेल्या नूतन गायकवाड यांनी परिस्थिती समोर हारायचे नाही तर लढायचे हे ठरवून इच्छाशक्ती व सकारात्मकतेच्या जोरावर मृत्यूवर विजय मिळवला. काळजी घेणारी स्त्री स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते, ही जाणीव ठेवून महिला व पुरुषांना योग व व्यायामाच्या माध्यमातून रोग मुक्त करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com