जागतिक परिचारिका दिन : सलाम शुश्रूषेला! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बळ देतोय रुग्णसेवेचा वसा 

गायत्री जेऊघाले / भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

युद्धामध्ये जखमी सैनिकांना मलमपट्टी करत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगल यांचा मंगळवारी (ता. 12) जन्मदिन. हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक परिचारिका वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात फायटर्स म्हणून खांद्याला खांदा लावून सक्रिय असलेल्या परिचारिकांना त्यांचा रुग्णसेवेचा वसा बळ देतोय, अशा भावना जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला परिचारिकांनी "सकाळ'शी बोलताना नोंदविल्या... 

जागतिक परिचारिका दिन विशेष 
-- 
कीकर 
सलाम शुश्रूषेला! 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बळ देतोय रुग्णसेवेचा वसा 

युद्धामध्ये जखमी सैनिकांना मलमपट्टी करत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगल यांचा मंगळवारी (ता. 12) जन्मदिन. हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक परिचारिका वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात फायटर्स म्हणून खांद्याला खांदा लावून सक्रिय असलेल्या परिचारिकांना त्यांचा रुग्णसेवेचा वसा बळ देतोय, अशा भावना जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला परिचारिकांनी "सकाळ'शी बोलताना नोंदविल्या... 
-
-- 
Image may contain: 1 person, outdoor, closeup and nature
गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा सरकारी रुग्णालयात रुग्णसेवा करत आहे. रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे या ब्रीदाप्रमाणे शुश्रूषा करत आहे. रुग्णसेवा ही लाखमोलाची सेवा आहे. आदिवासी भागात रुग्णांची सेवा करताना त्यांच्याकडून प्रेमाची पोचपावती मिळते. प्रामाणिकपणे रुग्णसेवा करताना अनेक रुग्ण बरे झाल्यानंतर कौतुक करतात. तसेच अनेक रुग्ण घरी गेल्यावर फोन करतात. दर वर्षी जागतिक परिचारिका सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, सप्ताह रुग्णांच्या सेवेत आहे. -वैशाली हुले, जिल्हा रुग्णालय, नाशिक 

Image may contain: 1 person, standing
परिचारिका म्हणून 29 वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत आहे. रुग्णांच्या चेहऱ्यावरचे हसू बघून त्यांची सेवा केल्याचे समाधान नेहमी मिळते. तसेच काही रुग्ण वर्षानुवर्षे केलेल्या सेवेची पावती म्हणून आवर्जून फोन करतात. अनेक रुग्ण माझ्याकडून सेवा करून घेतात. त्यांचा वाढता आत्मविश्‍वास पाहून मनाला केलेल्या कामाचे समाधान मिळते. सध्या कोरोना वॉर्डमध्ये 12 ते 13 तास रुग्णांची शुश्रूषा करत आहे. हे करत असताना मनात कुठलीही शंका न ठेवता सेवा देत आहोत. -छाया शिंदे, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नाशिक 

 

Image may contain: 1 person, outdoor
रुग्णसेवेचे व्रत 13 वर्षांपासून स्वीकारले आहे. ते पूर्ण करत असताना हातून पुण्याचे काम होत असल्याचे वाटते. ईश्‍वरसेवेप्रमाणे रुग्णसेवा ही मोठी सेवा आहे. अपघात कक्षात काम करताना काही रुग्णांकडून प्रेमाचे शब्द दिले जातात. त्यामुळे सेवा करताना उत्साह येतो. काही रुग्ण बरे झाल्यावर कौतुकाची थाप देतात. रुग्णदेखील सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. त्यातून त्यांचे आरोग्य लवकरात लवकर सुधारून त्यांना डिस्चार्ज दिला जातो. -शकिला पठाण, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय 

Image may contain: 1 person
नामको कर्करोग रुग्णालयात तीन वर्षांपासून रुग्णांची शुश्रूषा करत होते. तेथे काम करताना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. काही रुग्ण आजाराचे निदान झाल्यावर खचून जातात. त्या वेळी त्यांचे समुपदेशन करण्याचे काम करावे लागते. तसेच वेळोवेळी त्यांना गोळ्या-औषध देणे, तसेच मानसिक संतुलन बिघडू नये यासाठी वेळोवेळी समजूत घालण्याचे काम करावे लागते. प्रत्येक रुग्ण घरातली व्यक्ती समजून त्याची सेवा करत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोना रुग्णांची शुश्रूषा करत आहे. -रीना तडवी, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय 

Image may contain: 1 person, selfie and closeup
नाशिकमधील जिल्हा सरकारी रुग्णालयात 1998 मध्ये परिचारिका म्हणून रुजू झाले. सहा वर्षे निफाडला शुश्रूषा केली. 2007 पासून पुन्हा नाशिकच्या रुग्णालयातील अपघात विभागात कार्यरत आहे. सध्या कोरोना विषाणूची साथ सुरू आहे आणि मी कोरोना कक्षात कार्यरत आहे. एक संपूर्ण आठवडा इथेच राहून आलेल्या रुग्णांची सेवा केली. इतर रुग्णांच्या तुलनेत कोरोनाग्रस्त रुग्णांना सांभाळणे अवघड आहे. या रुग्णांचे नातेवाईक, सगेसोयरे होऊन त्यांची काळजी घ्यावी लागते. माझी लहान मुलगी आठवीत आहे. तिला यादरम्यान सांभाळणे थोडे कठीण झाले होते. -वैशाली पराते, जिल्हा रुग्णालय 

Image may contain: 1 person, child
मी 1994 मध्ये चांदवडमध्ये रुजू झाले. वणीला भीषण बस अपघात झाला होता. अपघातातील जवळपास 36 मृतदेह आले होते. त्या वेळी मी 48 तास रुग्णालयात कार्यरत होते. त्या वेळी केलेल्या सेवाकार्याबद्दल प्रशस्तिपत्र मिळाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवेळी शुश्रूषा केली आहे. कसारा येथे हाजला जाणाऱ्यांचा अपघात झाला होता. त्या वेळीही मी सेवेत होते. -पूनम धनवटे, विभागीय संदर्भसेवा रुग्णालय 

Image may contain: 1 person, closeup
मी गेल्या 13 वर्षांपासून कार्यरत आहे. ज्या वेळी मी रुजू झाले, त्या वेळी मी आठ महिन्यांची गर्भवती होते. माझी पहिली "पोस्टिंग' नंदुरबार जिल्ह्यातील एका गावात झाली होती. त्यानंतर 2012 ते 2018 पर्यंत "कॅज्युअल्टी' विभागात काम केले. इथे सर्व मृतदेहांची पाहणी मी केली. सध्या मी सिन्नरला कार्यरत आहेत. कोरोना विषाणूच्या रुग्णांची मी सेवा करत आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या आसपास फिरणे कठीण आहे. सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ नसल्याने मी डॉक्‍टरांच्या सहाय्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांचे स्वॅब घेतले होते. 
-वैशाली बिंड, सिन्नर उपजिल्हा रुग्णालय 

Image may contain: 1 person, closeup
कोरोनाविरुद्धच्या लढाईत मी कार्यरत आहे. कोरोना कक्षातील सेवा पूर्ण करून मी नुकतीच घरी आले आहे. कक्षाच्या सेवेत असताना घरची काळजी होती. त्याबरोबर रुग्णांची विशेष काळजी घेतली. बारावीत असलेल्या मुलीने समजूतदारपणा दाखवत या काळात मला खंबीर साथ दिली. गेल्या 20 वर्षांपासून मी रुग्णांची सेवा करत आहे. -सारिका वाघ, जिल्हा सरकारी रुग्णालय 

 Image may contain: 1 person, standing
मी 26 वर्षे रुग्णसेवा केली आहे. 12 वर्षे सरकारी आणि त्यानंतर नऊ वर्षे विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात सेवा केली. 2016 पासून मालेगावला सेवा करून आता पुन्हा संदर्भसेवा रुग्णालयात रुजू झाले आहे. हृदयविकाराच्या एका रुग्णाला शस्त्रक्रिया करून बाहेर आल्यावर अचानक त्रास सुरू झाला. त्या वेळी काही मिनिटांमध्ये रुग्णाला योग्य इंजेक्‍शन देऊन त्याला वाचविले. सेवा करत असताना वडिलांवरदेखील उपचार करण्याची वेळ आली. नातेवाइकांवर उपचार करणे अतिशय संयमाचे काम असते. वडिलांवर उपचार करत असताना सोबतच्या सहकारी मैत्रिणींनी मोठा धीर दिला. वडिलांना अतिदक्षता विभागामध्ये "ऍडमिट' करावे लागले. -संगीता जाधव, विभागीय संदर्भ रुग्णालय 
Image may contain: 1 person, closeup
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्व परिचारिका उतरल्या आहेत. साऱ्या जणी रुग्णसेवेचा वसा चालवत आहेत. त्याचा अभिमान वाटतो. -शोभा खैरनार, परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Nurses Day Special story nashik marathi news