ह्रदयद्रावक! नातेवाईकांच्या भेटीसाठी त्रिकुटांचा प्रवास; मात्र काळानेच अडविली वाट

night road.png
night road.png

येवला (नाशिक) : रात्रीचा थरार...येवल्यात आपल्या नातेवाईकांना भेटून माघारी परततांना नियतीने केला घात. हसत-बोलत त्रिकुटांचा दुचाकीहून घराच्या दिशेने प्रवास. मात्र काळाने वाट अडवलीच. अंगावर काटा आणणारी घटना. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

वार शुक्रवार (ता. 30) नातेवाईकांना भेटण्यासाठी कोपरगावचे तीन तरुण येवल्याला आले होते. जरावेळा थांबून चहापान झाला. गप्पा मारण्यात वेळ कसा गेला त्यांना कळले नाही. त्यानंतर ते घराकडे निघाले. मात्र काळ अन् वेळ सांगून येत नाही हेच खरं. रात्री ७ .३० च्या सुमारास म्हसोबा मंदीराजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने त्यांचा मोटारसायकलला कट मारला. गाडी जरा दूरपर्यंत घासरली अन् गाडीसोबत हे तिघे देखील. मात्र मागून येणाऱ्या भरधाव ट्रक खाली तिघे आले. यातच तिघे चिरडले गेले. या अपघातात मोटारसायकलवरील पंकज पंडित गायकवाड (वय २६ रा. जेऊर कुंभारी ता. कोपरगाव जि. नगर) हा जागीच झाला. तर सुजीत भिमराव जाधव (वय २९) व प्रदिप दिलीप जाधव (वय २५) (दोघे राहणार शहा पंचाळे ता. सिन्नर) गंभीर जखमी झाले आहेत.

गावावर शोककळा

पंकजच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर गंभीर जखमींना बाहेरगावी हलवणेची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होते. पो. ना राजेंद्र पाटील, पो .कॉ. विकास कराड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवले. अधिक तपास पो. ह. बी. बी. कांदळकर करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com