महिला अधिकारीचे आधी अपहरण..विनयभंग..अखेर 'तो' योगशिक्षक पोलीसांच्या तावडीत

woman kidnapped.jpg
woman kidnapped.jpg

नाशिक / म्हसरूळ : हनुमाननगर येथील पार्क साइड परिसरात निफाड येथील महसूल विभागातील महिला अधिकारी कुटुंबासह राहतात. बुधवारी रात्री त्या त्यांच्या इमारतीखाली उभ्या असताना परिचित योगशिक्षक संशयिताने त्यांना बळजबरीने वाहनातून बसवून नेत विनयभंग केला होता.

काय घडले नेमके?

हनुमाननगर येथील पार्क साइड परिसरात निफाड येथील महसूल विभागातील महिला अधिकारी कुटुंबासह राहतात. बुधवार (ता. 1) रात्री त्या त्यांच्या इमारतीखाली उभ्या असताना परिचित योगशिक्षक संशयित शिवराज पाटील यांनी त्यांना बळजबरीने वाहनातून बसवून नेत विनयभंग केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच महिला अधिकाऱ्यास डीजीपीनगर ते वडाळा रोड रस्त्यावरच सोडून देत पसार झाला होता. आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. फरारी योगशिक्षकास शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अटक करण्यात आली. शनिवारी संशयितास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. 

योगशिक्षकास अटक

महसूल विभागाच्या महिला अधिकाऱ्याचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी फरारी संशयित योगशिक्षकास आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (ता. 3) रात्री साडेदहाच्या सुमारास अटक केली. शनिवारी (ता. 4) संशयितास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com