दुर्देवी! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं; तरुण शेतकऱ्याचा अखेरचा निर्णय

anil.jpg
anil.jpg

येवला (नाशिक) : वय अवघं २७ पण डोक्यावर शेतीचं कर्ज, उसनवारी, दुकानांची उधारी आणि त्यातूनच कर्जाच्या ओझ्याखाली चिंताग्रस्त असतांनाच रेंडाळे येथील अनिल गरुड या तरुण शेतकऱ्याने घेतला अखेरचा निर्णय. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

रेंडाळे येथील तरुण शेतकरी अनिल गरुड याने अवर्षणग्रस्त भागात आपल्या दोन एकर खडकाळ शेतीच्या तुकड्यावर मेहनत केली. पत्नी, दोन मुली, एक मुलगा, थकलेले म्हातारे वडील आणि दम्याच्या आजाराने त्रस्त आई असे कुटुंब त्याच्यामागे आहे. कोरडवाहू शेतीत उद्याचे स्वप्न फुलवत त्याने संसाराची गाडी रुळावर आणण्यासाठी संघर्ष चालवला होता. अल्पशिक्षित पत्नी, अकरा वर्षांची एक आणि आठ वर्षांची दुसरी मुलगी, पाच वर्षांचा मुलगा या कुटुंबाचा एकमेव आधार अनिलच होता. परिस्थिती गरिबीची असल्याने संघर्ष त्याच्या कपाळी लिहिलेला होता. शक्य तेथून उसने पैसे घेऊन झाले होते. कर्ज काढून मोठ्या आशेने कांदा, मका, कापूस लावला. पण पावसाने साथ दिली पीक खूप चांगलं आलं अन् हाताशी आलेले पीक अतिवृष्टीने निर्दयीपणे हिरावून घेतले आणि तिथेच तो खचला...
दोन दिवसांपुर्वी रविवारी (ता. 8) अनिलने शेतीची किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केली. 

अन् त्याने विषारी औषध घेतल्याचे समजले...

घरातील शेतीचे कर्ज, इतर ठिकाणच्या कर्जासह, दुकानांची उधारीवर वारंवार दारुच्या नशेत बोलत होता. अखेर त्याने औषध घेतल्याचे लक्षात आले असता त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण नियतीने त्यांना हिरावले. या घटनेचा पंचनामा नगरसुल दुरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक एस.के.सुरासे, पोलिस दिपक सांगळे यांनी केला. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अल्ताफ शेख करीत आहे. दरम्यान, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, सरकार दरबारी पोहचविण्यासाठी मदत करावी व त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com