पंचवीस फूट पाण्यात पाऊणतास शोध घेऊन झाला खुलासा; ग्रामस्थांमध्ये चर्चा

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 24 September 2020

अग्निशामक दलाचा जवान शकील अहमद ऊर्फ तैराक याने वीस ते पंचवीस फूट पाण्यात तब्बल पाऊणतास शोध घेऊन  हाती जे सापडले त्याने ग्रामस्थांना धक्का बसला.  रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.  

नाशिक / मालेगाव : अग्निशामक दलाचा जवान शकील अहमद ऊर्फ तैराक याने वीस ते पंचवीस फूट पाण्यात तब्बल पाऊणतास शोध घेऊन  हाती जे सापडले त्याने ग्रामस्थांना धक्का बसला.  रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.  

काय घडले?

बुधवारी (ता.२३) सकाळी ट्यूबवर बसून मासेमारीसाठी सुनील पाण्यात गेला. या पाण्याजवळून वीजवाहक तार गेली आहे. त्याचा शॉक लागूनच तो पाण्यात बुडाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. मळगाव (ता. मालेगाव) शिवारातील गिरणा धरण बॅकवॉटरमध्ये बुडून सुनील राजेंद्र ठाकरे (वय २६, रा. भोसलेवाडी) या मच्छीमार तरुणाचा मृत्यू झाला. दुपारपर्यंत शोध घेऊनही तो मिळून आला नाही. दुपारी महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाचा जवान शकील अहमद ऊर्फ तैराक याने वीस ते पंचवीस फूट पाण्यात तब्बल पाऊणतास शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.  

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young fisherman drowns girna backwater nashik marathi news