बहिणीच्या सासरी जायचे भावाचे राहूनच गेले...समजले तेव्हा एकच आक्रोश..

rohit nandgaon 1.png
rohit nandgaon 1.png

नाशिक / नांदगाव : रेल्वेरुळावर मृतावस्थेत सापडलेल्या 21 वर्षीय तरुणाची अखेर ओळख पटली असून, तो तरुण मालेगाव येथील कलेक्‍टरपट्टा परिसरातील पाटीलनगरमधील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. रोहित भटू खेडकर असे मृत तरुणाचे नाव आहे. 

बहिणाच्या सासरी जायचे होते पण राहूनच गेले...

रेल्वे पोलिसांना सोमवारी (ता. 24) पिंपरखेड ते नस्तनपूरदरम्यान डाउन साइडच्या रेल्वे रुळावर 21 वर्षीय तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळला होता. रेल्वे पोलिस शिवाजी इघे यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी आणला. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बराच काळ रेल्वेरुळावर पडून राहिल्याने ओळख पटविणे अवघड गेले. सोमवारी रोहित बहिणीच्या सासरी जळगावला विवाह समारंभासाठी गेला होता. मात्र, रोहित विवाह समारंभाला पोचलाच नसल्याचे कळल्यावर त्याचा शोध सुरू होता. याबाबत मालेगावच्या छावणी पोलिसांत भाऊ रोहन याने रोहित बेपत्ता झाल्याची नोंदही केली होती. बेपत्ता रोहितचा शोध घेणे सुरू होते.

रोहितचा सामाजिक क्षेत्रात मोठा सहभाग

नांदगावजवळील रेल्वेरुळावर आढळलेला मृतदेह बघण्यासाठी मालेगावहून कुटुंबातील व्यक्ती नांदगाव ग्रामीण रुग्णालयात गेल्या. मात्र, त्यांना सुरवातीला ओळख पटविता आली नव्हती. मात्र, गुरुवारी (ता. 27) खात्री झाल्याने नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. मालेगावच्या श्रीरामनगर स्मशानभूमीत रोहितवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील तरुणांची लक्षणीय उपस्थिती रोहितच्या सार्वजनिक जीवनातील लोकप्रियेतची साक्ष देणारी होती. कलेक्‍टरपट्टा परिसरातील रोहितचा सामाजिक क्षेत्रात मोठा सहभाग असायचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com