दुर्दैवी! विद्युत मंडळाचा निष्काळजीपणा..कुटुंबाचा आधार कमावत्या मुलाचा ह्रदयद्रावक अंत; नातेवाईकांचा आक्रोश

surgana boy death.jpg
surgana boy death.jpg

नाशिक / पळसन : सुरगाणा तालुक्यातील माणी परिसरात विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे, गावातील नागरिक वीज निर्मिती सुधारण्याकरिता वीज पुरवठा केंद्राला अर्ज करतात. तरीदेखील त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येते. या सर्व गोष्टींमुळे स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो, याच गोष्टीमुळे कुटुंबाचा आधार एकुलत्या एक मुलाचा जीव गेला आहे. 

असा घडला दुर्दैवी प्रकार

सुरगाणा ते बार्हे हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर भरपूर प्रमाणात दळण वळण व रहदारी होत असते. विजय रमेश कहांडोळे याचे राहत्या गावात चायनीजचे दुकान असून तो आज(ता.१२) सकाळी 8 वाजेच्या सुमारास दुकान उघडून पिण्याचे पाणी आणण्याकरिता तो व त्याच्या लहान भाऊ योगेश असे दोघे मोटारसायकल घेऊन सुरगाणाकडील रस्त्याला निघाले असता गावाच्या कमानी पासून 500 मीटरला वीजेचा पुरवठा करणारा पोल पडल्याने चालक विजय कहाडोळे याच्या अंगावर विजेच्या तारा पडल्या. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला व त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा लहान भाऊ याला विजेचा करंट बसल्याने तो देखील मोटारसायकल वरुन फेकला गेला व त्याचा जीव वाचला.

पंचनामा करून पुढील तपास

यावेळी विद्युत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीचे दृश्य आढळून आले, सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिवानसिग वसावे याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर नाद्रे व त्याची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.
 

माणी येथील तरूण युवक पाणी आणण्यासाठी जात असताना अचानक अंगावर विजेचा खांब कोसळून सदर तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा तरूण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या घरातील कमवता तो एकटाच होता.कुटुंबातील कमवता गेल्याने कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी लेखी स्वरुपात निवेदन उपअभियंता सुरगाणा याना दिले आहे. - राजु राऊत, श्रमजिवी संघटनेचे  तालुका अध्यक्ष सुरगाणा

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com