PHOTOS : धरणावर गेलेला 'तो' परतलाच नाही...अवघ्या गावाचे डोळे त्याच्या वाटेकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

शनिवारी रात्री 8.00 वाजेच्या सुमारास गणपत मुरलीधर बॅंडकोळी (वय 35) हा गावलागतच्या कश्यपी धरणात बुडाला असल्याची खबर सहकारी उत्तम बॅंडकोळी (अपंग) याने तातडीने स्थानिकांना खबर दिली, गावकऱ्यांनी धरणावर अंधार असतांना ही शोध घेतला, गर्दी केली मात्र, ​

नाशिक : (गिरणारे) कश्यपी धरणाच्या उत्तरेस असलेल्या गालोशी गावातील इंदिरानगर पाड्यावरील मासेमारी व्यवसायातील वाचमन म्हणून कार्यरत असलेला युवक तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. शर्तीचे प्रयत्न करूनही बुडलेल्या युवकाचा अद्यापही मृतदेह हाती लागलेला नाही. 

तिसरा दिवस उगवला मात्र मृतदेह हाती लागला नाही...

शनिवारी रात्री 8.00 वाजेच्या सुमारास गणपत मुरलीधर बॅंडकोळी (वय 35) हा गावलागतच्या कश्यपी धरणात बुडाला असल्याची खबर सहकारी उत्तम बॅंडकोळी (अपंग) याने तातडीने स्थानिकांना खबर दिली, गावकऱ्यांनी धरणावर अंधार असतांना ही शोध घेतला, गर्दी केली मात्र, काही मागसुस लागला नाही. कश्यपीच्या विस्तीर्ण खोल पाण्याचा परिसर त्यात लाटा खोल डोहात युवक बुडल्याचे समजताच रात्रीच गावकऱ्यांनी हरसूल पोलिसांना खबर दिली. तसेच, रविवार (ता.9 ) रोजी चांदोरी सायखेडा येथील आपत्ती व्यवस्थापन शोध पथकाने बोटीद्वारे बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोध घेतला. मात्र, शर्थीचे प्रयत्न करून ही घटनेनंतर तिसरा दिवस उगवला मात्र मृतदेह हाती लागला नाही. अजूनही शोधकार्य सुरूच आहे. या घटनेमुळे अख्खं गाव व परिसरातील अनेक शेतकरी महिला युवक संबंधित युवकाचे नातलग धरणाकाठी गर्दी करून आहे.

Image may contain: one or more people, ocean, sky, outdoor, nature and water

 

हेही वाचा > आर्श्चयच!..स्वतःला लागणारी वीज अन् ते देखील घरच्या घरीच तयार!...

Image may contain: one or more people, ocean, sky, outdoor, water and nature

एकमेव कर्ता व्यक्ती गेल्याने घरदार निराधार

दरम्यान कश्यपीच्या पात्रात बुडलेल्या युवकांच्या कुटुंबात वयस्कर आई, वडील, पत्नी, 3 मुली, 1 मुलगा असा परिवार असून घरातील एकमेव कर्ता व्यक्ती गेल्याने घरदार निराधार झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या कुटुंबाला, मुलांच्या शिक्षणाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. आपत्ती  व्यवस्थापनाकडून त्या युवकाचा मृतदेह शोधण्यात प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा > जीव मुठीत घेऊन ओढतोय संसाराचा गाडा!...जायबंदी झालाय वाडा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man drown in Kashyapi dam nashik marathi news