पुन्हा तीच घटना! तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच दोषी? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

police.jpg
police.jpg

नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा व्हिडिओ गाजत असतानाच, आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
 

पोलीसांनी केला खुलासा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कुणाल गायकवाड व बिना ऊर्फ प्रिया निकम यांचा विवाह २०१४ ला झाला. विवाहानंतर प्रियाचा पती कुणाल, सासू नंदा गायकवाड, सासरे विलास गायकवाड, दिर योगेश गायकवाड, नणंद तनुजा रासकर, तृष्णा फुलसुंदर यांनी प्रियाकडे फुलांचा व्यवसाय करण्यासाठी पैशांची मागणी करीत शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याच्या त्रासाला कंटाळून २१ ऑक्टोबर २०२० ला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर पंचवटी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयितांना अटक करण्यात आली होती. 

"तुला पुन्हा जेलमध्ये पाठवू,’...

हे सर्व संशयित जामिनावर बाहेर आल्यानंतर कुणाल गायकवाड याला पोलिस कर्मचारी असलेला साडू मनोज खैरे, मेहुणी सोनाली सोनवणे, ज्योती खैरे, वृषाली महाजन, सासरे रमेश निकम, माणिक महाजन या सर्वांनी मोबाईलवर फोन करून, ‘तू जास्त उड्या मारू नको, तुझे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे असून, हे पोलिस अधिकाऱ्यांना देऊन तुला पुन्हा जेलमध्ये पाठवू,’ अशा धमक्या देत, ‘तू आमचे पैसे आणि दागिने परत कर’, अशी धमकी देत एका लग्नसमारंभात शिवीगाळ करून टॉर्चर केल्याने कुणाल गायकवाड याने आत्महत्या केली. मृत कुणाल याने त्याच्या वडिलांच्या हॉस्पिटलच्या फाइलवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण लिहिलेले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, त्यात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयितांच्या नावांचा उल्लेख आहे. तसेच तो नशेत असल्याचा उल्लेख केलेला आहे.  

चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

भद्रकाली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा व्हिडिओ गाजत असतानाच, पंचवटी पोलिस ठाण्यातही पोलिसाच्या छळाला कंटाळून त्याच्या साडूने आत्महत्या केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. कुणाल विलास गायकवाड (वय ४०, रा. हिरावाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीच्या आत्महत्येनंतर तुरुंगातून सुटल्यानंतर साडू असलेल्या पोलिसांकडून त्रास सुरू झाल्याने त्याने आत्महत्या केली. १९ फेब्रुवारीला त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करणाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिस कर्मचाऱ्याचे व त्याच्या नातेवाईकांच्या नावांचा उल्लेख केला आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com