PHOTOS : अचानक रक्तस्त्राव झाल्यावर 'त्याला' समजले...की काहीतरी भयंकर झालयं

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मिथिल साळुंखे बुधवारी (ता. 15) सकाळी नांदूर नाका येथील त्याच्या वर्कशॉपवर दुचाकीवरून जात होता. तपोवन पुलावर अचानक त्याच्या शरीरावर रक्तस्त्राव व्हायला लागला..बघतो तर काय..

नाशिक : मिथिल साळुंखे सकाळी नांदूर नाका येथील त्याच्या वर्कशॉपवर दुचाकीवरून जात होता. तपोवन पुलावर अचानक त्याच्या शरीरावर रक्तस्त्राव व्हायला लागला..बघतो तर काय..

असा घडला प्रकार...

मिथिल साळुंखे बुधवारी (ता. 15) सकाळी नांदूर नाका येथील त्याच्या वर्कशॉपवर दुचाकीवरून जात होता. तपोवन पुलावर अचानक त्याच्या गळ्यास नायलॉन मांजाचा फास लागून गळा कापला गेला. रक्तस्त्राव झाल्याने गळा कापल्याचे लक्षात येताच त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी जखमेस आठ टाके मारले. दुचाकीचा वेग कमी असल्याने खोलवर जखम झाली नाही. कथडा येथील तरुणाचा दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळा कापल्याची घटना बुधवारी (ता.16) घडली. त्यात तरुण जखमी झाला. मिथिल गुलाबराव साळुंखे (वय 25) असे तरुणाचे नाव आहे. 

Image may contain: 1 person, standing and outdoor

हेही बघा > PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

28 पक्ष्यांना फास; प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर 

भद्रकाली पोलिस ठाणे, शालिमार, मेन रोड, रेडक्रॉस अशा विविध ठिकाणी नायलॉन मांजाचा फास लागून पक्षी जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या. बुधवारी एका दिवसात सुमारे 28 पक्ष्यांची नायलॉन मांजाच्या फासातून अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. गुरुवारी (ता. 16) अनेक ठिकाणी पक्ष्यांना मांजाचा फास लागल्याच्या घटना घडल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली. नायलॉन मांजाच्या सर्रास होणाऱ्या विक्रीकडे दुर्लक्ष झाल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला. नायलॉन मांजा तयार कंपन्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.  

Image may contain: one or more people and bird

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth Injured by Nylon kite rope Nashik Marathi News