नगरभूमापन कार्यालयात प्रमाणपत्रांसाठी "दलाली'! 

नगरभूमापन कार्यालयात प्रमाणपत्रांसाठी "दलाली'! 

नगरभूमापन कार्यालयात प्रमाणपत्रांसाठी "दलाली'! 
जळगाव ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरभूमापन (सिटी सर्व्हे) कार्यालयात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय आहेत. प्रमाणपत्रासाठी पंधरा रुपये शासकीय शुल्क असताना चक्क शंभर रुपये आकारले जातात. नंतर प्रमाणपत्रासाठी फिरवाफिरव केली जाते. शेवटी ज्याला प्रमाणपत्र पाहिजे असते, त्याच्याकडून दलाल दोन हजार घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचे चित्र येथे आहे. दरम्यान, नगरभूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा अनुभव आमदार सुरेश भोळे यांनाही दोन दिवसांपूर्वीच आला. त्यांच्या एका कार्यकर्त्यास मोजणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने आमदार भोळे स्वतः नगरभूमापन कार्यालयात आले. तरीही अधिकारी नसल्याचे सांगून प्रमाणपत्र देण्यात आले नाही. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील काय, असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. 

नगरभूमापन कार्यालयात नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळतात. शेतीचा उतारा, शेती नावावर करणे, घर नावावर करणे, "सिटी सर्व्हे'चा रिपोर्ट मिळविणे यांसह घर, शेतीसंबंधी प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांसाठी शासकीय शुल्क पंधरा रुपये आहे. मात्र, आलेल्या व्यक्तींकडून अधिकचे शुल्क आकारले जाते. ते भरल्यानंतरही दहा ते पंधरा दिवस प्रमाणपत्रांसाठी फिरविले जाते. अनेक वेळा चकरा मारून त्रासलेल्या नागरिकांना तेथील दलाल गाठतो. तुमचे काम आजच व्हावयाचे असल्यास दोन हजारांची मागणी करतो अन्‌ काय आश्‍चर्य दोन हजार रुपये देताच, काही मिनिटांत संबंधितास हवे ते प्रमाणपत्र मिळते. रोज "दलाली'तून पन्नास हजार ते एक लाखाची "कमाई' होत असल्याचा अंदाज आहे. या कार्यालयाचे प्रमुख नगरभूमापन अधिकारी यशवंत बिऱ्हाडे आहेत. त्यांच्यावरील अधिकारी भूमिअभिलेख अधिकारी सुनील भोंगळे आहेत. 

नगरभूमापन कार्यालयाबाबत तक्रारी 
आमदार सुरेश भोळे ः नगरभूमापन कार्यालयाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. मला दोन दिवसांपूर्वीच त्याचा अनुभव आला. एका कार्यकर्त्यास मोजमापाबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल दोन तास मी त्या कार्यालयात थांबलो. मात्र, प्रमाणपत्र मिळाले नाही. या कार्यालयाच्या अनागोंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com