मातृवंदना'चा 27 हजार महिलांना लाभ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

मातृवंदना'चा 27 हजार महिलांना लाभ! 
जळगाव, ता. 28 ः प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर महिलांना पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येत असते. त्यानुसार जिल्ह्यातील 27 हजार 852 गरोदर महिलांना नऊ कोटी 84 लाख 40 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पात्र गरोदर मातांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. 
 

मातृवंदना'चा 27 हजार महिलांना लाभ! 
जळगाव, ता. 28 ः प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर महिलांना पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येत असते. त्यानुसार जिल्ह्यातील 27 हजार 852 गरोदर महिलांना नऊ कोटी 84 लाख 40 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पात्र गरोदर मातांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. 
 
दारिद्य्ररेषेखालील व दारिद्य्ररेषेवरील बहुतांश महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी कामावर जावे लागते. अशा गरोदर महिला कुपोषित राहून त्यांचे व प्रसूतीनंतर त्यांच्या नवजात शिशूच्या आरोग्यावर परिणाम होतो. परिणामी, देशात माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढते. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर महिला व स्तनदा मातेला सकस आहार देण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे "प्रधानमंत्री मातृवंदना योजना' देशात एक जानेवारी 2017 पासून लागू करण्यात आली. त्यानुसार प्रथम गरोदर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. 

तीन टप्प्यांत अनुदान 
मातृवंदना योजनेत लाभार्थी महिलेला तीन टप्प्यांत अनुदानाची रक्‍कम मिळत असते. यात गर्भधारणा नोंदणीवेळी एक हजार रुपये, गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यात दोन हजार रुपये अनुदान मिळते. त्यात एक तपासणी आवश्‍यक आहे, तसेच प्रसूतीनंतर बालकांची जन्मनोंद आणि तिसरा डोस पूर्ण झाल्यनंतरच्या पडताळणीनंतर दोन हजारांचे अनुदान बॅंक अथवा टपाल खात्यात जमा केले जाते. योजनेत सहभागासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज कण्यासाठी आरोग्य केंद्रांकडे संपर्क साधणे गरजेचे आहे. 

मातृवंदना योजनेसाठी नोंदणी सुरू 
"प्रधानमंत्री मातृवंदना योजने'साठी जळगाव जिल्ह्यातून गेल्या दोन वर्षांत 27 हजार 852 लाभार्थ्यांना आतापर्यंत नऊ कोटी 84 लाख 40 हजारांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले. या योजनेसाठी नोंदणी सुरू आहे. तालुकानिहाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका समूह संघटक, आरोग्यसेवक, सेविका व आशा स्वयंसेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
---------- 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: मातृवंदना'चा 27 हजार महिलांना लाभ!