कॉंग्रेस-राष्ट्रवादी आठ जागांवर आमने-सामने 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आठ जागांवर आमने-सामने 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आठ जागांवर आमने-सामने 

जळगाव : पालिकेतील सत्ताधारी गटासह राज्य व केंद्रातील सत्ताधीश भाजपला आक्रमक विरोधाचा पवित्रा घेत महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करून रिंगणात उतरलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आठ ठिकाणी आमने-सामने उभे ठाकले आहेत. दोन ठिकाणी समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी, तर एका जागेवर या तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. 
भाजप व शिवसेनेशी सारखे वैर ठेवून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महापालिकेचे मैदान गाजविण्याचे यावेळी ठरविले. आघाडीच्या बैठका झाल्या, जागावाटपही निर्विघ्नपणे पार पडले. मात्र, आता माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आणि आठ जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार समोरासमोर ठाकले असल्याचे दिसून आले. 

आघाडीनंतरही आमने-सामने 
प्रभाग क्र. 1 "क'मध्ये खान जरीनाबी शेर (कॉंग्रेस) व खान नजीम मोहम्मद (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. 5 "ड'मध्ये सय्यद फारुक सय्यद गफ्फार (कॉंग्रेस), रहीम बलदार तडवी (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. 6 "ड'मध्ये श्‍यामकांत दगडू तायडे (कॉंग्रेस), किरण लक्ष्मण राजपूत (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. 8 "ड'मध्ये स्वप्नील प्रकाश नेमाडे (राष्ट्रवादी), राजेंद्र ताराचंद सोनवणे (कॉंग्रेस), प्रभाग क्र. 10 "क'मध्ये अरुणा दीपक पाटील (कॉंग्रेस) व नलूबाई देवसिंग पाटील (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. 15 "ड'मध्ये शेख आसिफ अन्वर (राष्ट्रवादी) व दीपक पुंडलिक बाविस्कर (कॉंग्रेस), प्रभाग क्र. 16 "अ'मध्ये मनोज डिगंबर चौधरी (कॉंग्रेस) व आशा शांताराम सूर्यवंशी (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होत आहे. 
याशिवाय प्रभाग क्र. 1 "क'मध्ये कमल हिरामण पाटील (राष्ट्रवादी) व मोहिनी विशाल वाघ (समाजवादी पक्ष) यांच्यात, तर प्रभाग क्र. 16 "ड'मध्ये भरत दिलीप बाविस्कर (कॉंग्रेस), सुरेशकुमार कुकरेजा (राष्ट्रवादी) व मोहम्मद इकबाल अब्दुल समर (समाजवादी पक्ष) या आघाडीतील तिघांमध्ये लढत होत आहे. 

Web Title: सामने