५६ वधूवरांना लागली हळद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

शहादा : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्या शहादा, नंदुरबार विभागाच्या सहकार्याने व श्री. संतसेना नाभिक समाज सेवा मंडळातर्फे उद्या (ता.४) ला शहादा येथील खरेदी विक्रीचा प्रांगणात होणाऱ्या २६ जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आज पहिल्या दिवशी ५२ वधूवरांना प्रथेनुसार हळद, हरिद्रालेपन, रास पूजन, बेल माथनी पूजन, नवग्रहशांती, सार्थक, पेहरावणी, पाणेतर,दीपपूजन आदी कार्यक्रम झाले.

शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात यंदा समाजाचा सातवा व संतसेना समाज सेवा मंडळातर्फे पहिला सामुहिक विवाह सोहळा होत आहे. नाममात्र एक रूपया शुल्क घेत या सोहळयात २६ जोडप्यांचा विवाह लावण्यात येणार आहेत. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस विविध कार्यक्रम होत आहेत. हळद व विविध धार्मिक विधीसाठी वरवधूंसाठी स्वतंत्र स्टेज, पालकांची स्वतंत्र बैठकव्यवस्था, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

लोणीकरांचा शिरपूर येथे निषेध

विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश आदी राज्यातील तीन हजार समाजबांधव उपस्थित होते. उद्याचा विवाह समारंभास साधारणतः सहा हजार समाजबांधव तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आज सामुदायिक विवाह सोहळा
आज (ता.४) सकाळी नऊला नवरदेवांची मिरवणूक सजविलेल्या ट्रॅक्टरवरून निघेल. यानंतर सकाळी अकराला सामुदायिक विवाह सोहळा पार पडेल. विविध संसारोपयोगी साहित्य वितरण व विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण होईल. नवदाम्पत्यांची विदाई रोप भेट देऊन करण्यात येईल.

या सोहळ्यासाठी धर्मदाय आयुक्त, महिला बालकल्याण विभाग, समाजातील विविध गावातील संस्था, संघटना, तरूण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, समाजपंच मंडळ व विविध संघटना प्रयत्नशील आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ५६ Couple Ready for Marriage in Shahada