आणखी एका शेतकऱ्याने संपविले जीवन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

जामोद, (जळगाव) : सततची नापिकी, कर्जाचा डोंगर व त्यातच मुलीच्या लग्नाची चिंता सतावत असल्याने व्यथीत झालेल्या जामोद येथील शेतकऱ्याने अखेर गळफास घेवून शनिवारी (ता. २३) घडली. विठ्ठल सिताराम धर्मे (वय ५०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. 

जामोद येथील विठ्ठल सिताराम धर्मे यांच्याकडे दोन एकर शेती होती. मात्र आर्थिक अडचणी असल्याने त्यांनी ते विकून टाकले. त्यानंतर ते ठोका बटाईची शेती करून संसाराचा गाडा चालवित होते. मात्र कर्ज व नापिकीने ते त्रस्त होते. अखेर रविवारी विठ्ठल धर्मे यांनी जामोद गावातील रामभाऊ भगत यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचा भाचा ज्ञानेश्‍वर धुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. विठ्ठल धर्मे यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार असून, दोन मुली अविवाहित आहेत. 

पंधरवाड्यात तिसरी घटना
जळगाव जामोद तालुक्‍यात गेल्या १५ दिवसात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. संजय रामकृष्ण बोचरे रा. खेर्डा, नामदेव महादेव नेमाडे खांडवी व विठ्ठल सिताराम धर्मे रा. जामोद अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. शेतकरी आत्महत्येचे सत्र तालुक्‍यात चिंतेचा विषय बनला आहे.

Web Title: 1 more farmer suicide in jalgao