भटक्या कुत्र्यांनी दहा जनावरांचा पाडला फडशा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

येवला : शहरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच जात असुन, कुत्र्यांनी शहरालगत राहत असलेले नागडे रस्त्यावर प्रगतशील शेतकरी अरविंद शिंदे यांच्या शेतातील गोटफार्मवरील सात शेळ्या व तीन वासरांचा फडशा पाडला.

येवला : शहरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच जात असुन, कुत्र्यांनी शहरालगत राहत असलेले नागडे रस्त्यावर प्रगतशील शेतकरी अरविंद शिंदे यांच्या शेतातील गोटफार्मवरील सात शेळ्या व तीन वासरांचा फडशा पाडला.

शुक्रवारी पहाटे या भटक्या कुत्र्यांनी लोखंडी जाळी तोडुन कुत्र्यांनी जनावरांवर हल्ला केला असल्याने शिंदे यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.
साधारण दहा ते पंधरा कुत्र्यांनी एकाच वेळी हा हल्ला केला असल्याचे मृत जनावरांच्या मानेवर, पोटावर तसेच पायावर दाताने खोलवर जखमा झाल्याने, तसेच पोटाचा भाग लचके तोडुन ओढल्याने ही जनावरे मृत झाली आहेत. या घटनेमुळे परिसरातील नववसाहतीत राहणार्‍या नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास उपोषण व आंदोलन करणार असल्याचे अरविंद शिंदे यांनी यावेळी सांगीतले. 

शहरात मोकाट कुत्र्याच्या वाढत्या दहशतीमुळे शहरातील तसेच येणार्‍या नागरिकाध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करून नागरिकांना भयमुक्त करावे अशी परिसरातील नागरिकाकडून मागणी होत आहे. 

भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असुन माणसाच्या अंगावर धावून जाणे, चावा घेणे, वाहनावर धावून येणे असे प्रकार घडत आहे.यामुळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.चौकाचौकात, गल्ली बोळात कुत्र्यांनी हैदोस घातला असून ऐन रात्रीच्या वेळी जेवणानंतर रपेट मारण्यासाठी व पहाटे फिरावयास बाहेर निघणार्‍या नागरिकाच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.मोकाट कुत्र्याचे टोळके रस्त्यावरून फितात व ते चावा घेण्यासाठी अंगावर धावतात.रात्रीबेरात्री घरासोर भुंकत असल्याने नागरिकाच्या झोप मोड होत असल्याचे अनेकांनी सांगितले. या कुत्र्याच्या दहशतीने अनेक नागरिकांनी रात्रीचे फिरणे देखील बंद केले आहे. वारंवार मागणी करून देखील पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकाध्ये संताप व्यक्त केला जात आहे.पालीका प्रशासनाने मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करून शहरातील नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी शहरातून होत आहे.

Web Title: 10 cattle eat by street dogs