
Dhule Marathon : मॅरेथॉनसाठी धुळे मनपातर्फे 10 लाख
धुळे : जिल्हास्तरीय मॅरेथॉन (Marathon) स्पर्धा-२०२३ ला सहकार्य तथा खारीचा वाटा उचलण्याच्या अनुषंगाने धुळे महापालिकेतर्फे दहा लाखांचा धनादेश देण्यात आला. (10 lakhs by municipal corporation for Cooperation to Marathon dhule news)
महापालिकेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा अभिनव उपक्रम यापुढेही सुरू राहील, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांच्या पुढाकाराने ५ फेब्रुवारीला धुळ्यात जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा-२०२३ झाली. सुदृढ-निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. स्पर्धेसाठी ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक होता.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
या स्पर्धेला मदत व सहकार्य व्हावे या हेतूने धुळे महापालिकेने दहा लाखांचा धनादेश दिला. पोलिस अधीक्षक बारकुंड यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, मनपा सभागृहनेते राजेश पवार, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले,
माजी विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, नगरसेविका वंदना भामरे, भिकन वराडे, अजय अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, उपायुक्त विजय सनेर, लेखाधिकारी गजानन पाटील, ‘सकाळ’चे ब्युरो चीफ निखिल सूर्यवंशी, चंद्रकांत मोरे, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.