दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली "नीट'ची परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिब्लीटी कम एंट्रान्स टेस्ट (नीट) परीक्षेस उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. एकलव्य निवासी शाळेच्या केंद्रासंदर्भात प्रवेशपत्रावर "मुंडेगाव' असा उल्लेख असल्याने सुमारे दीडशे पालकांनी इगतपुरी तालुक्‍यातील मुंडेगाव गाठले. परंतु संबंधित केंद्र एकलव्य निवासी शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत पेठरोडवर असल्याचे समजल्यानंतर पालक, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सुमारे चाळीस किलोमीटरचा प्रवास करत विद्यार्थ्यांनी केंद्र गाठत परीक्षा दिली.

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिब्लीटी कम एंट्रान्स टेस्ट (नीट) परीक्षेस उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. एकलव्य निवासी शाळेच्या केंद्रासंदर्भात प्रवेशपत्रावर "मुंडेगाव' असा उल्लेख असल्याने सुमारे दीडशे पालकांनी इगतपुरी तालुक्‍यातील मुंडेगाव गाठले. परंतु संबंधित केंद्र एकलव्य निवासी शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत पेठरोडवर असल्याचे समजल्यानंतर पालक, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सुमारे चाळीस किलोमीटरचा प्रवास करत विद्यार्थ्यांनी केंद्र गाठत परीक्षा दिली. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी आजची नीट परीक्षा दिली. 

परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकदेखील होते. विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेल्यावर पालक केंद्राच्या आवारात सावलीत ठाण मांडून होते. एकलव्य निवासी शाळा व सिम्बॉयसेस शाळेतील प्रकार वघळता अन्य केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. नीट परीक्षेच्या पार्श्‍वभुमिवर नियुक्‍त कर्मचाऱ्यांना सकाळीच बोलविण्यात आलेले होते. 

दरम्यान एकलव्य निवासी शाळेच्या केंद्रावर सुमारे तीनशे विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केलेली होती. "एकलव्य निवासी शाळा, मुंडेगाव यांचे कर्मचाऱ्यांचे निवास स्थान, मार्केट यार्डासमोर' अशा नमुद केलेल्या पत्याने पालकांची फसगत केली. मुंडेगाव असा उल्लेख आल्याने काही पालकांनी इगतपुरी तालुक्‍यातील मुंडेगाव गाठले. परंतु संबंधित परीक्षा ही पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डासमोरील कर्मचाऱ्यांच्या वसतीतील इमारतीत असल्याचा फलक लावलेला असल्याने पालकांनी तातडीने धाव घेतली. काहींनी दुचाकीवर ट्रिपल शिट तर काहींनी खासगी वाहनास जादा पैसे देत पेठरोडवरील केंद्र गाठले. पालकांच्या जमावामुळे संबंधित केंद्रावर सव्वा दहापर्यंत पोहचलेल्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश देण्यात आला. परंतु परीक्षेच्या वेळेत मात्र वाढ करून दिली नाही. 

सिम्बॉयसिस शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला 
सिडकोतील सिम्बॉयसिस शाळेत विद्यार्थी नियोजित वेळेत हजर होते. आत छायाचित्र काढण्याची व्यवस्था असल्याचे केंद्रात प्रवेश करतांना विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. परंतु केंद्रात प्रवेश केल्यानंतर येथे छायाचित्र काढण्याची सुविधा नसून बाहेरुन काढून आणावे, असे सांगितले गेले. विद्यार्थी छायाचित्र काढण्यासाठी बाहेर पडले असता पुन्हा त्यांना आता प्रवेश नाकारण्यात आला. पालक विद्यार्थ्यांनी विनवणी करूनही व पालकमंत्री, शिक्षण उपसंचालक यांच्यासह अन्य विविध अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. यामुळे सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांना काहीही चुक नसतांना परीक्षेपासून मुकावे लागले. 

Web Title: 10 thousand students for NEET exam