आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी 100 भरारी पथके

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

इगतपुरी - आदिवासी जिल्ह्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्याच्या सोयीसुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी 100 हून अधिक भरारी पथके स्थापन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली.

आदिवासी जिल्ह्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने तातडीच्या उपाययोजना राबविण्याची सूचना केली होती. आश्रमशाळांबरोबरच डोंगरमाथ्यांवरील आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य विभागाची सेवा पोचेपर्यंत अनेकदा अडचणी येतात. विशेषतः पावसाळ्यात आदिवासींना रुग्णालयापर्यंत नेणे जिकिरीचे होते. पावसाळ्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढलेले असते. पालघर, चंद्रपूर, नांदेड, नाशिक, नंदूरबार, गोंदिया, धुळे, पुणे आदी जिल्ह्यांत 108 भरारी पथके स्थापण्यात येतील. मोबाईल व्हॅनमधून आरोग्याच्या या सोयीसुविधा पुरविण्यात येणार असून, आरोग्य विभागाने चार कोटींची तरतूद केली आहे.

Web Title: 100 flying squads for ashramshala student