समृद्धी महामार्गाच्या  निविदेसाठी सोळा तुकडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

नाशिकः नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची 16 भागांत विभागणी करीत राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 2227 कोटी 15 लाखांच्या निविदा प्रक्रिया 
गुरुवार (ता. 8)पासून सुरू केल्या. त्यामुळे साधारण एप्रिलपासून महामार्गाच्या कामाला सुरवात होण्याची अपेक्षा आहे. 
शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर लॅन्ड पुलिंगऐवजी थेट खरेदीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीचा निर्णय घेत शासनाने समृद्धी महामार्गाचे काम पुढे चालविले. पण त्यानंतर पाचपट दर आणि 24 तासांत पैसे जमा करण्याच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी होऊन शासकीय मालकीच्या जमिनीसह शासनाला 60 टक्केवर जमिनी खरेदी 

करण्यात आतापर्यंत यश आले. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या निविदा प्रक्रियेला सुरवात झाली. संपूर्ण महामार्गाची 16 भागांत विभागणी करत स्वतंत्र संस्था नियुक्ती करीत कामही वेगानेच पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर ते मुंबई दरम्यानच्या या मार्गासाठी 9 एप्रिलपर्यंत निविदेची मुदत आहे. गुरुवार (ता. 8)पासून महामंडळाच्या संकेतस्थळावर निविदा उपलब्ध केल्या आहेत. 9 एप्रिलला दुपारी तीनपर्यंत निविदेची मुदत आहे. 10 एप्रिलला दुपारी तीनला निविदा उघडल्या जाणार आहेत.