शिधापत्रिका आणि निराधार नोंदणीची फरकट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

नाशिकः जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालये बंद करीत, आपले सरकार पोर्टलद्वारे दाखले उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला असला तरी, गुजरात इन्फोटेकच्या 
सेतू कार्यालयातील काही सॉप्टवेअरच्या मक्तेदारीमुळे शिधापत्रिका आणि निराधार नोंदणीसाठी मात्र अद्याप कुठलाही समर्थ दिलेला नाही. त्यामुळे शिधापत्रिकेची कामे आणि निराधारांच्या नोंदणीसाठी नागरिकांची फरकट सुरु झाली आहे. त्याचा गैरफायदा घेत, दलाली सुरु झाली आहे. 

डिजीटल इंडियार्तंगत देशात आणि राज्यात शासकीय कार्यालयीन कामकाज ऑनलाईन करण्यासाठी शासनाने खासगी संस्थाची मदत घेतली होती. त्यापैकी गुजरात इन्फोटेक या संस्थेच्या सेतू कार्यालयातर्फे आतापर्यत राज्यभर दाखले देण्याचे काम चालायचे. गुजरात इन्फोटेकने दाखले वितरणासाठी स्वताचे काही सॉप्टवेअर विकसित केले. पण आता सेतूचे कामकाज नाशिक जिल्ह्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गुजरात इन्फोटेक कंपनीचे सेतू कायार्लयाचे कामकाज बंद झाले आहे. त्यामुळे गुजरात इन्फोटेक ची 
मुक्तेदारी असलेल्या काही सॉफ्टवेअर अभावी नागरिकांची परवडही सुरु झाली आहे. बंद झालेल्या सेतूने त्यांचे सॉफ्टवेअरही बंद केले असून अशा स्थितीत, नवीन व्यवस्था माहीती नसल्याने ही गैरसोय सुरु झाली आहे. 

जिल्ह्यात ऑनलाईन कामकाजाचे हे सॉप्टवेअर बंद केल्याने, निराधारांच्या नोंदणीचे कामकाज थंडावले आहे. जेव्हा सेतू कायार्लय सुरु होते तेव्हाही निराधारांचे 3500 हजाराहून आधिक प्रकरणाचे कामकाज मंदावले होते. आता सेतूच बंद झाल्याने नवीन नोंदणी पूणर्‌ बंद झाल्याने जिल्हाभरातून संजय गांधी निराधार योजनेत नाव नोंदणीसाठी येणाऱ्या निराधारांची परवड सुरु आहे. दूरच्या गावातून भाडे खर्चुन नाशिकला येणाऱ्या निराधारांना बंद सेतू कार्यालय पाहून परत जावे लागते. ही गैरसोय लक्षात घेउन काही दलालांनी शासकीय कार्यालयाच्या आवारातच दलाली सुरु केली आहे. बंद कायार्लयाच्या आवारात दुचाकी वाहनांवर उभे राहून अव्वाच्या सव्वा पैसे मागण्याचा धंदा मांडला आहे. तुमचे काम करायचे तर पैसे द्या. दोन दिवसांत इथेच भेटा या आणि अशा उत्तर देउन खुलेआम लुटमार सुरु झाली आहे.