पिकांसाठी 3200 कोटींचे कर्ज देणार
जळगाव ः जिल्हा प्रशासनाने आज सर्व बॅंकांचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांची बैठक घेऊन सहा हजार 209 कोटी रुपयांचे कर्ज देण्याबाबतचा आराखडा तयार केला आहे. त्या पिकांसाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
जळगाव ः जिल्हा प्रशासनाने आज सर्व बॅंकांचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांची बैठक घेऊन सहा हजार 209 कोटी रुपयांचे कर्ज देण्याबाबतचा आराखडा तयार केला आहे. त्या पिकांसाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
वार्षिक कर्ज योजनेचा जिल्ह्याचा 2018 -19 चा आराखडा आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. जिल्हा अग्रणी बॅंकेचे समन्वयक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था विशाल जाधवर, नाबार्डचे जी. एम. सोमवंशी, विवेक पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख, विविध बॅंकांचे प्रतिनिधी प्रवीण मुळे, प्रदीप व्यवहारे, संजय लोणारे, दिनेश चौधरी, अजय शर्मा, गुलशनकुमार सिंग आदी उपस्थित होते.
गरजूंना स्वतःच्या पायावर उभे करा..
कृषी अकृषिक क्षेत्रातील विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून बॅंकांनी गरजूंना अर्थसाहाय्य करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करावी. कर्जे वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी मिळून पूर्ण करून जिल्ह्यातील गरजूंना व शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसाहाय्य मिळेल याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
असा आहे नियोजन आराखडा
जिल्ह्यात 2018-19 साठी
पीक कर्जाकरीता उद्दिष्ट 3200 कोटी
अन्य स्वरूपाच्या कृषी कर्जांसाठी उद्दिष्ट 1036 कोटी 42 लाख
कृषी क्षेत्रासाठी उद्दिष्ट 4236 कोटी 42 लाख
अकृषिक क्षेत्रासाठी 942 कोटी 5 हजार रुपये,
अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी उद्दिष्ट 935 कोटी 38 लाख
अन्य क्षेत्रांसाठी 195 कोटी 15 लाख
एकूण नियोजित आराखडा 6209 कोटी