मरणाच्या दारातून अनेकांना वाचविणारी...अशी 'ती' ग्रामस्थांसाठी ठरतेय जीवनदायिनी!

एस. डी. आहिरे : सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 8 डिसेंबर 2019

महिन्याभरापूर्वी पिंपळगाव शहरातील बालकाने विषारी औषध सेवन केल्याने ते अत्यवस्थ होते. तिच्यामुळे ते पिंपळगाववरून तत्काळ नाशिकला संदर्भित केले व त्याचे प्राण वाचविले. हे वानगीदाखल उदाहरण असले, तरी मरणाच्या दारातील अनेकांना तिने पुन्हा जग बघण्याची संधी दिली आहे.

नाशिक : वेळेची किंमत जिवावर बेतल्यावरच कळते. अपघात, सर्पदंश, हृदयविकार, प्रसूती, अर्धांगवायू, आत्महत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर घटनांमध्ये रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोचविणारी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. निफाड तालुक्‍यात घडलेल्या विविध अपघाताप्रसंगी ही रुग्णवाहिका तत्काळ देवदूतासारखी धावून आली आहे. 108 रुग्णवाहिकेमुळे वेळेत दवाखान्यात पोचून डॉक्‍टरांच्या उपचाराखाली आल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. 

वेळेत उपचार मिळाल्याने निफाड तालुक्‍यातील अनेकांना जीवदान 

राज्य शासनाचा आरोग्य सेवा व भारत विकास ग्रुप सेवातर्फे राज्यात 108 रुग्णवाहिकेद्वारे सेवा दिली जात आहे. निफाड तालुक्‍यात सुमारे 15 रुग्णवाहिका नागरिकांवर ओढविणाऱ्या संकटसमयी धावून जातात. ज्याद्वारे रुग्णावर वेळेवर उपचार होऊन जिवावर बेतणाऱ्या प्रसंगातून बाहेर काढले जात आहे. संकटकाळात 108 क्रमांक डायल करायचा, ही माहिती आता ग्रामीण भागातील ग्रामस्थांना झाली आहे. त्यामुळे अनेकांचे पैसे व वेळेची बचत होऊन जीवदान मिळाले आहे.

Image may contain: 1 person, standing, car and outdoor

पिंपळगाव बसवंत : अनेकांचे प्राण वाचविणारी पिंपळगाव आरोग्य केंद्रातील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका. 

....यापूर्वी ग्रामस्थ होते अस्वस्थ..रुग्णवाहिका म्हणजे छोटे रुग्णालय ​

महिन्याभरापूर्वी पिंपळगाव शहरातील बालकाने विषारी औषध सेवन केल्याने ते अत्यवस्थ होते. 108 रुग्णवाहिकेमुळे ते पिंपळगाववरून तत्काळ नाशिकला संदर्भित केले व त्याचे प्राण वाचविले. हे वानगीदाखल उदाहरण असले, तरी मरणाच्या दारातील अनेकांना 108 ने पुन्हा जग बघण्याची संधी दिली आहे. 108 रुग्णवाहिकेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रुग्णाला दवाखान्यात पोचवत नाही, तर रुग्णवाहिका म्हणजे छोटे रुग्णालय आहे. या रुग्णवाहिकेत डॉक्‍टर सोबत असतात. यांसह ऑक्‍सिजन, आवश्‍यक औषधसाठा, स्टेचर, व्हील चेअर अशी साधनसामग्री असते. 

Image may contain: indoor

108 रुग्णवाहिकेने वर्षभरात निफाड तालुक्‍यात दिलेली सेवा 
रस्त्यावरील अपघात- एक हजार 461, हृदयविकार- 16, विषबाधा- 796, प्रसूती- पाच हजार 894, विजेचा धक्का बसणे- 37, इतर अपघात- 56. 

हेही वाचा > PHOTO : आई-वडिलच ते शेवटी...कुंभार असून मुलीच्या 'या' स्वप्नाचा विचार त्यांच्या डोक्यात..अखेर...

माणसापेक्षा तत्पर 

कुठेही तत्काळ मदत हवी असल्यास 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेशी संपर्क साधावा. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित व्यक्ती घाबरून मदतीसाठी पुढे येत नाहीत. आम्हाला कळविल्यानंतर आम्ही लगेचच रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो. - डॉ. योगेश धनवटे, वैद्यकीय अधिकारी, पिंपळगाव बसवंत

हेही वाचा > शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

हेही वाचा > हजार रुपयाचे आमिष दिले अल्पवयीन मुलाला...अन् घेऊन गेले रुमवर..त्यानंतर..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 108 Ambulance is becoming the lifeblood of villagers Nashik Marathi News