१०८ रुग्णवाहिका ठरली जीवनदायी

रोशन भामरे
गुरुवार, 12 जुलै 2018

तळवाडे दिगर(नाशिक) - राज्य आरोग्य विभाग आणि बिव्हिजी (भारत विकास ग्रुप) इंडिया लिमिटेड या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून डायल १०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे नाशिक जिल्ह्यात एक लाख ३२ हजार ९८४ रुग्णांनी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसचा लाभ घेतला आहे.

तळवाडे दिगर(नाशिक) - राज्य आरोग्य विभाग आणि बिव्हिजी (भारत विकास ग्रुप) इंडिया लिमिटेड या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून डायल १०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे नाशिक जिल्ह्यात एक लाख ३२ हजार ९८४ रुग्णांनी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसचा लाभ घेतला आहे.

वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकदा अपघातातील जखमींचा प्राण जाण्याचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत सुरु केलेल्या १०८ टोल फ्री रुग्णवाहिका सेवेने १२ महिन्यात अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. जिल्ह्यातील नाशिक ६ ,मालेगाव ६ ,सटाणा ३ ,कळवण ३ ,देवळा २ ,सुरगाणा ३ ,पेठ १ ,त्र्यबकेश्वर २ ,दिंडोरी ४ ,इगतपुरी ४ ,सिन्नर ३ ,निफाड ५ ,चांदवड १ ,येवला १ ,नांदगाव २ तालुक्यातील आरोग्य केंद्रातर्गत सेवेच्या ४६ रुग्णवाहिका धावतात. कोणत्याही ठिकाणी अपघाताची घटना घडल्यास यांना पाचारण केले जाते.

एएलएसच्या ११ तर बीएलएसच्या ३५ रुग्वाहिका, ११ रुग्वाहिका या(एएलएस) अँडव्हान्स लाईफ सपोर्ट असून, त्यात अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. शॉक देण्याची यंत्रणा तसेच व्हेंटीलेटर, आयसीयु मधील सर्व सुविधा उपलब्ध असून, उर्वरित ३५ रुग्णवाहिकामध्ये (बीएलएस)बेसिक लाईफ सपोर्ट आहेत. त्या सर्व रुग्णवाहिकेत सर्व यंत्रसामुग्री आहे मात्र व्हेंटीलेटर नाही या रुग्णवाहिकेमध्ये एक इमर्जन्सी असिस्टंट अर्थात चालक तर एक इमर्जन्सी डॉक्टर कार्यरत असतात.

“ नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत आदिवासी व दुर्गम भाग असून अशा सर्व तालुक्यात १०८ ह्या सुविधेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.सध्या पावसाळा सुरु असून रुग्णांना कोणतेही लक्षण आढळून आल्यास १०८ रुग्णवाहिका बोलवावी. रुग्णवाहिकेत सर्व उपचाराच्या सुविधा असून डॉक्टर कार्यरत असतात”
- डॉ. अश्विन राघमवार, जिल्हा व्यवस्थापक, नाशिक

Web Title: 108 ambulances are life-sustaining