नाशिक- 1.35 कोटींच्या बनावट नोटांसह 11जण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नाशिक- येथे 1.35 कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

जप्त केलेल्या नोटा नव्या आहेत की जुन्या याबाबत अद्याप संभ्रम आहे. नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करीत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप संपतराव सस्ते, रमेश गणपत पांगारकर, ईश्वर मोहन परमार, राकेश सरोज परमार, नीलेश सतीश लायसे, प्रभाकर केवल घराते, संतोष भिमा गायकवाड, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण संजयराव मांढरे, छबु दगडू नागरे, रामराव तुकाराम पाटील यांचा समावेश आहे. 
 
Web Title: 11 arrested with 1.35 crore counterfeit notes