नाशिकला बारावी परीक्षेत पकडले 11 कॉपीबहाद्दर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नाशिक - उच्च माध्यमिक प्रामणपत्र (बारावी) परीक्षेला मंगळवारपासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी नाशिक विभागातून अकरा कॉपीबहाद्दर पकडण्यात आले असून, त्यात जिल्ह्यातील सिन्नरच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला ऑलिंपिकपटू दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे हेदेखील परीक्षा देता आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील 86 केंद्रांवर तर नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात 218 केंद्रांवर आजपासून परीक्षेला सुरवात झाली. परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही काही ठिकाणी परीक्षार्थींना कॉपी पुरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच्या पहिल्या पेपरला सिन्नर येथे दोन कॉपीबहाद्दर पकडण्यात आले असून त्याशिवाय धुळेला सहा, जळगावला व नंदुरबार येथील केंद्रावर एक असे एकूण 11 कॉपीबहाद्दर पकडण्यात आले. बहुतांश ठिकाणी सुरळीतरीत्या परीक्षा पार पडली. 

इंग्रजीच्या पेपरविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये थोडे दडपण बघायला मिळाले. परंतु एकंदरीत आजचा पेपर सोपा असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रोईंग सिंगल स्कूल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारा दत्तू भोकनळ यानेही लासलगाव केंद्रात तीन परीक्षा दिली. तर मविप्र संस्थेच्या सीएमसीएस महाविद्यालयात विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे हिनेही आज परीक्षा दिली.

Web Title: 11 perosn caught in hsc exam