नामपूरला लाल कांद्याची 11 हजार क्विंटल आवक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नामपूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याची आवक टिकून होती. आज सुमारे 422 वाहनांमधून सुमारे 11 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला 670 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस, उपसभापती अविनाश सावंत यांनी दिली. सकाळी अकराला लिलाव सुरू झाले. मोसम खोऱ्यात यंदा लाल कांद्याची विक्रमी लागवड असल्याने बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक टिकून आहे. लाल कांद्याला कमीत कमी 300 रुपये, तर सरासरी 525 रुपये, असा भाव होता. मक्‍याची 125 वाहनांतून सुमारे तीन हजार क्विंटल आवक झाली.

नामपूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याची आवक टिकून होती. आज सुमारे 422 वाहनांमधून सुमारे 11 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला 670 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस, उपसभापती अविनाश सावंत यांनी दिली. सकाळी अकराला लिलाव सुरू झाले. मोसम खोऱ्यात यंदा लाल कांद्याची विक्रमी लागवड असल्याने बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक टिकून आहे. लाल कांद्याला कमीत कमी 300 रुपये, तर सरासरी 525 रुपये, असा भाव होता. मक्‍याची 125 वाहनांतून सुमारे तीन हजार क्विंटल आवक झाली. एक हजार 328 रुपये सर्वोच्च, तर 1300 रुपये सरासरी भाव होता. शेतमालाच्या विक्रमी आवकेने बाजार समितीचे आवार फुलून गेले होते. लिलावानंतर सर्व शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे पैसे अदा झाले. कांद्याची प्रतवारी करून माल विक्रीस आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव अरुण अहिरे यांनी केले. 

Web Title: 11 thousand quintals of red onion arrivals namapurala