एका मिनिटात 1,111 वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

अमळनेर (जि. जळगाव) - महसूल विभाग आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज येथील टेकडीवर सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी अवघ्या 1 मिनिटात एक हजार एकशे अकरा झाडे लावण्यात आली.

तहसीलदार प्रदीप पाटील यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यासाठी अमळनेर नगर परिषदेने 500 रोपे दिली, तर कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.

सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन विभाग, मंगळ ग्रह संस्था, सानेगुरुजी शाळा, डी. आर. कन्याशाळा, आर्मी स्कूल, एनसीसी, एनएसएस, मारवड विकास मंच, माझं गाव माझं अमळनेर गट, पोलीस पाटील संघटना, जवखेडा विकास मंच, तलाठी संघटना, महिला मंच, खाशी मंडळ, अर्बन बॅंक, पाडळसरे संघर्ष समिती या विविध संघटनांनी गणवेषात हजेरी लावून हा उपक्रम केला.

Web Title: 1111 Tree Plantation in One Minit