प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सहाणेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन् अर्जही दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नाशिकः निवडणूकीत उमेदवार देतांना पक्षातील निष्ठावंताचा विचार होईल. पण सोबतच निवडून येण्याची क्षमता पाहून बेरजेचे राजकारणाला महत्व दिले जाईल.असे संकेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऍड शिवाजी सहाणे यांच्या उमेदवारीचा गणित स्पष्ट केले. 

नाशिकः निवडणूकीत उमेदवार देतांना पक्षातील निष्ठावंताचा विचार होईल. पण सोबतच निवडून येण्याची क्षमता पाहून बेरजेचे राजकारणाला महत्व दिले जाईल.असे संकेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऍड शिवाजी सहाणे यांच्या उमेदवारीचा गणित स्पष्ट केले. 

श्री पाटील यांच्या उपस्थितीत आज विधान परिषदेच्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी ऍड सहाणे यांचा उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी ऍड सहाणे यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश झाला. जिल्हाध्यक्ष ऍड रविंद्र पगार, श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, दिपिका चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, जयंत जाधव, नाना महाले, गजानन शेलार, भारती पवार, दिलीप बनकर, अद्वय हिरे, निवृत्ती अरिंगळे, विश्‍वास ठाकूर, रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातच कार्यकर्त्यांचा सन्मान होतो हे इतर पक्षातील कार्यकर्त्याना पटू लागले आहे. त्यामुळेच इतर पक्षातील पदाधिकारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेशासाठी इच्छूक आहे. आगामी निवडणूकांमध्ये उमेदवारी देतांना पक्षातील कार्यकर्त्यासोबतच इतर पक्षातील इच्छूकांचा विचार केला जाईल.

निवडणूकीत निवडून येण्याची क्षमतेला महत्व दिले जाईल. विधान परिषदेच्या निवडणूकीत कॉग्रेस पक्षासोबत आघाडीची चर्चा सुरु आहे. त्यात लातूर येथील दिवंगत विलासराव देशमुख यांच्या बंधूसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने ती जागा कॉग्रेसला दिला आहे. आता पून्हा लातूरची जागा राष्ट्रवादी कॉग्रेसला हवी आहे. लातूर, बीड येथील जागांबाबत चर्चा सुरु आहे. कॉग्रेस पक्षाकडून अपेक्षित उत्तराची अपेक्षा आहे. 

सहाणेंचा विजय.... 
ऍड सहाणे काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेशासाठी इच्छूक होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत निकालानंतर अनेक वर्षे न्यायालयातही दोघात 
लढाई सुरु होती. पण अखेरच्या क्षणी जयंत जाधव यांनीही ऍड सहाणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. मी ज्या उमेदवारांची शिफारस केली आहे. त्यांचा कधी पराभव झालेला नाही. त्यांचा विजयीच झाला आहे. असे सांगून श्री पाटील यांनी ऍड सहाणे हेच विजयी होतील असा दावा केला. येत्या 31 मे पर्यत बुथनिहाय कार्यकर्ते नियुक्ती 
करावी. मे महिण्यातच तालुका व जिल्हास्तरीय संघटनात्मक बांधणी पूर्ण होईल. पक्ष बळकट करु शकणारे तालुकाध्यक्ष नेमले जातील. असे सांगितले. 

हिरे कुटुंबाला ऑफर 
काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉग्रेसशी जवळीक साधून असलेल्या आमदार अपूर्व हिरे व जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे हे आज सहाणे यांच्या पक्षप्रवेशावेळी 
राष्ट्रवादी भवनात उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, जाहीरपणे माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी आपल्यासोबत काम केले आहे. त्यामुळे हिरे कुटुंबियांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करावा. असे आवाहन केले.