कंपनीचे आमिष दाखवून सव्वा कोटींना गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नाशिक - भागीदारीमध्ये कंपनी सुरू करण्याचे आमिष दाखवून युवकाला तब्बल 1 कोटी 29 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित अभिषेक कुलकर्णी, त्याचे वडील अविनाश कुलकर्णी, आई आशा कुलकर्णी व प्राची आगरकर (सर्व रा. इंदिरानगर) यांच्याविरोधात उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अमित श्रीरंग कळमकर यांनी उपनगर पोलिस ठाण्यात यासंबंधाने फिर्याद दिली आहे. इंदिरानगर परिसरात राहणारा मित्र संशयित अभिषेक कुलकर्णीने भागीदारीमध्ये कंपनी स्थापन करण्याचे आमिष दाखविले. संशयितांनी संगतमत करून जानेवारी 2017 ते जुलै 2018 या दरम्यान कंपनीसाठी 1 कोटी 29 लाख 500 रुपये घेतले. मात्र त्यानंतर कंपनीही स्थापन झाली नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: 1.25 crore rupees cheating crime

टॅग्स