कालव्यात पडलेल्या अंगणवाडी सेविकेला 13 वर्षाच्या मुलाने वाचविले

A 13-year-old child was saved by the anganwadi worker in the canal
A 13-year-old child was saved by the anganwadi worker in the canal

निफाड : गाजरवाडी नांदुरमध्यमेश्वर शिवारातील गोदावरी कालव्यावर धोकादायक लोंखंडी पुल आहे. गाजरवाडी ता. निफाड येथुन शुक्रवारी अंगणवाङीचे काम आटोपून घराकडे परतणाऱ्या अंगणवाडी सेविका येथिल धोकादायक लोंखंडी पुलावरण जात असतांनाच तोल जावुन कालव्यात कोसळल्या. मात्र, तेथे असणाऱ्या अजय वळंबे 13 वर्षीय मुलाने क्षणाचाही विलंब नकरता वाहत्या पाण्यात उडी घेवुन अंगणवाडी सेविकेचा जिव वाचवल्याची साहसपुर्ण घटना घडली आहे.


उषाबाई पांडुरंग पगारे (वय 58) असे कालव्यातून वाचविण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. उषाबाई शुक्रवार दि 8 रोजी गाजरवाडी शिवारातील अंगणवाडीतील काम आटपून दुपारी 4 च्या सुमारास घरी निघाल्या होत्या. पण घरी येतांना कालवा ओलांडण्यासाठी पूल नाही. इथे पूर्वी लोंखंडी पाइप होते त्यावरून दोन्ही बाजूकडील लोक, शाळेतील मुले, मजूर वर्ग धोका पत्कारून ये जा करायचे. अनेक वर्षे दुर्लक्ष असलेल्या या भागात नुकत्याच निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी या भागातील लोकांचा हा जीवघेणा प्रवास पाहिला आणि लोकांच्या मागणीनुसार येथे लोखंडी पूल बांधायला दिला आहे. त्याचे काम सुरू असून त्यावर अजून पत्रा टाकणे बाकी आहे. याच पत्रा नसलेल्या पुलावरून शुक्रवारी उषाबाई तोल जाऊन वाहत्या पाटात पडल्या. 

उषाबाई पाण्यात पडल्याचे इंदूबाई शिंदे व अजय वळंबे यांनी पाहिले त्या क्षणी अजय या 13 वर्षीय मुलाने लगेच पाटात उडी घेतली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहणाऱ्या उषाताईना सुमारे अर्धा किलोमीटर पोहत जाऊन पाटाच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यांना लगेच नैताळें येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. मरणाच्या दारातून परत आलेल्या उषाबाई यांची प्रकृती आता स्थिर आहे. यापूर्वीही त्या या जीवघेण्या पाटाच्या पुलावरून कालव्यात कोसळल्या होत्या केवळ दैव बलवत्तर आणि कुठलाही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी वाहत्या पाटात उडी घेणाऱ्या अजयमुळे उषाबाई वाचल्या.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कालव्यावरील हा लोखंडी पादचारी पूल लवकर पूर्णत्वास न्यावा अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. अजयने कोवळ्या वयात दाखवलेल्या या सजगता व हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com