पंचवटी, द्वारका भागात ध्वनी पातळीचे सिमोल्लंघन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नाशिक - शहराचा विस्तार होत असताना कचरा, पार्किंग, वाढती वाहतुकीच्या समस्या गंभीर स्वरुप धारण करतं असताना आता नाशिककरांसमोर ध्वनी प्रदुषणाचे आव्हान निर्माण झाले आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालात शहरातील ध्वनी प्रदुषणाने धोकेदायक पातळी ओलांडली असून 55 डेसीबल ध्वनी मर्यादा असताना 70 डेसिबल पर्यंत ध्वनी मर्यादा पोहोचली आहे. पंचवटी, द्वारका व सिबिएस भागात सर्वाधिक ध्वनी प्रदुषण होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात नमुद करण्यात आला आहे. 

महापालिकेच्या वतीने दरवर्षी पर्यावरण अहवाल पालिकेला सादर केला जातो. त्यात हवा, ध्वनी प्रदुषणाची शहराची स्थितीबाबत वास्तवता मांडली जाते. गेल्या पाच वर्षापर्यंत ध्वनी व हवा प्रदुषण मर्यादीत स्वरुपात होते परंतू आता या पातळ्या ओलांडल्या जात आहे. यामुळे नाशिककरांना आता मुंबई, पुणे प्रमाणेचं आव्हान निर्माण झाले असून त्यावर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे एवढाचं पर्याय शिल्लक राहिला आहे. 

ध्वनी पातळी ओलांडली 
ध्वनी पातळी मोजताना शहराच्या विविध भागांमध्ये ध्वनी मापक यंत्रे बसविण्यात आली होती. औद्योगिक, रहिवासी, व्यापारी व शांतता क्षेत्र असे विभाग ध्वनी पातळी मोजताना करण्यात आले. त्यासाठी एका वर्षात तीनदा ध्वनी पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. शहरातील पंचवटी कारंजा भागात सर्वाधिक ध्वनिमर्यादा ओलांडली आहे. निवासी क्षेत्रासाठी दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल ध्वनी मर्यादा असावी परंतू पंचवटी कारंजा येथे दिवसा 72.6, तर रात्री 55.9 डेसिबल पेक्षा अधिक ध्वनी पोहोचला आहे. द्वारका भागात मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग व नाशिक-पुणे राज्य मार्ग जात असल्याने येथे ध्वनी मर्यादा ओलांडली आहे. येथे दिवसा 68.5, तर रात्री 53.1 डेसिबल ध्वनी मर्यादा नोंदविण्यात आली. 

व्यापारी क्षेत्रात दणदणाट 
व्यापारी क्षेत्रात दिवसा 65, तर 55 डेसिबल ध्वनी मर्यादा आहे. परंतू त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल येथे दिवसा 73, तर रात्री 65.5 डेसिबल ध्वनी मर्यादा ओलांडली आहे. मेनरोड भागात दिवसा 70.9, रात्री 60.2, सीबीएस परिसरात 70.8, तर रात्री 58.3, मुंबई नाका येथे दिवसा 69.3, तर रात्री 55.7 ध्वनी मर्यादा पोहोचली आहे. 

औद्योगिक क्षेत्र शांत 
औद्योगिक क्षेत्रात ध्वनि मर्यादा दिवसा 75, तर रात्री 70 डेसिबल निश्‍चित आहे. त्यानुसार सातपूर येथे दिवसा 72.1, तर रात्री 60.8 डेसिबल ध्वनी नोंदविला गेला. अंबड औद्योगिक वसाहतीत दिवसा 73.3 तर रात्री 62.4 डेसिबल इतक्‍या आवाजाची नोंद करण्यात आली. 

टॅग्स