करवाढ सरसकट रद्द करा,अन्यथा अविश्वासाला सामोरे जा,विरोधकांचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नाशिक ः महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपने दाखल केलेल्या अविश्‍वास प्रस्तावावर विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट होत असून आयुक्त मुंढे यांना शिवसेना व कॉंग्रेसने अल्टीमेटम देत सरसकट करवाढ रद्द करण्याची मागणी केली.

मुंढे यांनी दोन दिवसात करवाढ रद्द न केल्यास अविश्‍वास ठरावाला पाठींबा देण्याचा इशारा बुधवारी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे यांनी दिला. 
भाजपने दाखल केलेल्या अविश्‍वास प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी भूमिका जाहीर केली. अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून सोशल मीडियातून नगरसेवकांना बदनाम केले जात आहे.

लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी आहेत, कर्तव्यदक्ष आयुक्त नकोत, अशा शब्दात सोशल मीडियावरून मार्केटिंग केले जात असून नगरसेवकांची मानहानी करणारा प्रकार आहे. अवाजवी करवाढ लादली जाऊ नये व सरसकट करवाढ रद्द करावी अशी शिवसेना, कॉंग्रेस, मनसेकडून मागणी करण्यात आली. परंतु आयुक्तांनी अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. करवाढीत संपूर्ण शहर भरडले जाणार आहे.

शिवसेनेने आतापर्यंत सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून आजही तीच भूमिका कायम आहे. आयुक्तांनी करवाढीचा बालहट्ट सोडून नाशिककर व नगरसेवकांच्या भावनांचा आदर करावा, अन्यथा अविश्वास प्रस्तावाला शिवसेनेचा पाठींबा दर्शवेल असा इशारा बोरस्ते यांनी दिला. 

...तर कॉंग्रेसचा पाठींबा 
अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सोशल मीडियातून नगरसेवकांच्या बदनामीचा ट्रेंड सुरू झाला आहे. नगरसेवकांवर आरोप करताना तसे पुरावे देखील द्यावे. आम्ही नगरसेवक रस्त्यावर काम करणारे आहोत. त्यामुळेच पाच-सहा वेळा निवडून आल्याचे कॉंग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी सांगितले. सरसकट करवाढ रद्द झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. महासभेचा अवमान करण्याची मुंढे यांची भूमिका कायम राहिल्यास कॉंग्रेस अविश्वास प्रस्तावाला पाठींबा देईल, असेही त्यांनी नमूद केले.