एव्हीएशनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नाशिक - एव्हीएशन सेक्‍टरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून संशयितांनी बेरोजगार युवकाला सातत्याने फोन करून बॅंकेत पैसे भरण्यास लावून तब्बल 15 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने फसगत झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल दिलीप पंडिलवार (रा. शिवकॉलनी, पाथर्डी रोड, इंदिरानगर) या बेरोजगार युवकाने सायबर पोलिसात फिर्याद दिली आहे. स्वप्निल हा गेल्या डिसेंबर 2016 पासून नोकरीच्या शोधात असताना, अज्ञात संशयिताने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. या वेळी संशयिताने एव्हीऐशन सेक्‍टरमध्ये ग्राऊंट स्टाफ या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. 

Web Title: 15 lakh robbed for job in nashik