लोकसहभागातून काढला १५ सहस्त्र घनमीटर गाळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

येवला : सरहद्दीवरील गाव, पाण्याची टंचाई तर इथे होतीच, पण डोंगर, खडकाळ जमीन, जमिनीत दगड आणि गोटे, माती असलीच कुठं तरी नावाला.. अशा दुष्काळी रहाडी गावाने गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार या अभियाना अंतर्गत पथदर्शी काम करत जिल्ह्यात एकाच गावातुन १५ सहस्त्र घनमीटर गाळ काढून शेकडो एकर जमीन सुपीक केली आहे. जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी गावकऱ्यांना एकत्र करून २० मोठे डंपर आणि २५ ट्रॅक्टर मधून गाव शिवारात गाळ पोहोचवला आहे.

बऱ्याचदा दुष्काळ म्हटले की आपाल्याला टंचाई आठवते ती पाण्याची,पण मातीचाही दुष्काळ असतो हे बऱ्याच जणांना माहीत नसते.रहाडी हे मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेले असेच एक डोंगराळ गाव जेथे शेरभर बाजरी पेरली तर पीक येऊन शेरभर सुद्धा बाजरी तयार होईल की नाही याची शाश्वती नाही...पण अलीकडे गावातील तरुण संगणक अभियंता सोनवणे यांनी गावातील जल संधारणाच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.त्यांनी भांडून शासनाचा २० लाख रुपयांचा निधी मिळवत जलयुक्त शिवार अभियान गावात राबवून ४० वर्षां पासून फुटून वाहून गेलेला बाळगंगा बंधारा दुरुस्त केला.धरणरेषा नव्याने बांधली, सांडवा नव्याने बांधला पाण्याचा प्रश्न पाऊस पडल्या नंतर सुटणारच आहे.

मात्र गावातील खडकाळ जमीन,दगड गोटे हा गावातील अनेक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न होता.भागवतराव सोनवणे यांनी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या कानावर ही गोष्ट घालून गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार हे अभियान राबण्याची मागणी केली.गावातील बरीचशी शेतजमीन ही वाळवंट होण्यापूर्वीची शेवटची घटका मोजणारी जमीन सुपीक होत आहेत.येथे आज लोकसहभागातून १५ सहस्त्र घन मीटर गाळ काढून जिल्ह्यात अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. शेकडो एकर जमिनीवर लोकसहभागातून हा गाळ पसरवला गेला आहे.आता पावसाळ्यात दुरुस्ती केलेल्या धरणात सुमारे ९ दशलक्ष घनफुट पाणी तर अडणार आहेच पण सुपीक जमिनीत मोत्या सारखे पीक ही येणार आहे

“रीतसर पाठपुरावा केला कि सगळे मिळते,माही २० लाख रुपयांचा निधी मिळवून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जुन्या फुटून वाहून गेलेल्या तलावांची दुरुस्ती केली, नवीन धरण रेषा बांधली, नव्याने सांडवा बांधला.आता पावसाचे पाणी अडण्यासाठी बंधार्यातील गाळ काढला.मातीचाही दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्न केले असून यामुळे शेकडो एकर जमिनी सुपीक होणार आहे.
- भागवतराव सोनवणे, संयोजक जलहक्क संघर्ष समिती

Web Title: 15 thousand cubic meter sludge from dam