शासनाच्या बक्षीस रक्‍कमेपासून रोईंगपटू दत्तु भोकनळ वंचित, `सकाळ`ला भेट 

residentional photo
residentional photo

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड तालुक्‍यातील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ रोइंग प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडतो आहे. सुट्यांनिमित्त घरी आलेल्या दत्तू भोकनळ याने मंगळवारी (ता.16) सकाळच्या सातपुर कार्यालयाला भेट दिली. 2020 मध्ये टोकीओ ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी कसून सराव सुरू असून, भारताला पदक मिळवून देण्याचा ध्यास बाळगला असल्याचे दत्तूने यावेळी सांगितले. 

जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमध्ये क्‍वाड्रापल गटातून दूत्त भोकनळचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांच्या बक्षीस रक्‍कमेची घोषणा केली होती. बक्षीसाची घोषणाहूनही अद्यापपर्यंत बक्षीसाची रक्‍कम मिळाली नसल्याची खंत दत्तूने यावेळी व्यक्‍त केली. हरीयाणा सरकारने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना तीन कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. महाराष्ट्र सरकारने केवळ पन्नास लाख जाहीर केलेले असतांना त्यातही बक्षीसाची रक्‍कम अद्यापपर्यंत मिळत नसल्याचे दत्तूने नमुद केले. 

"सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी दत्तूचे स्वागत केले. गावाकडे शेतात मक्‍याच्या शेतात सोंगणी करतांनाचे दत्तूचे छायाचित्र सकाळच्या माध्यमातून ऑनलाईन व्यासपीठावर व्हायरल झाले होते. त्यास नेटकऱ्यांच्या मिळालेल्या प्रतिसादाबाबत दत्तूने आभार मानले. या भेटी दरम्यान दत्तूने गप्पांतून स्पर्धेतील तयारीचा आढावा घेतला. यापूर्वी ऑलिंम्पिक स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तर नुकत्याच जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत क्‍वाड्रापल गटातून दत्तूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. या भेटीप्रसंगी सोनाली शेलार उपस्थित होत्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com