Dhule News : साक्री तालुक्यासाठी 168 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fund

Dhule News : साक्री तालुक्यासाठी 168 कोटी

पिंपळनेर (जि. धुळे) : साक्री तालुक्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पा(Budget) १६८ कोटी रुपयांच्या भरघोस तरतुदीस आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नांना यश आले. (168 crore in state budget for Sakri taluka have been sanctioned dhule news)

राज्याच्या मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात साक्री तालुक्यासाठी बिगरआदिवासी क्षेत्रातील रस्ते, पूल, मोऱ्या यांच्यासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आदिवासी क्षेत्रातील रस्ते, पूल, मोऱ्या यांच्यासाठी ७१ कोटी २० लाख रुपये,

पिंपळनेर येथे शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी अडीच कोटी रुपये, तर साक्री तालुक्यातील तलाठी कार्यालये बांधण्यासाठी पाच कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशी सर्व १६८ कोटी रुपयांची भरघोस तरतूद साक्री तालुक्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या संदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आमदार मंजुळा गावित सातत्याने संपर्कात होत्या. अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करून दिल्याबद्दल आमदार गावितांनी साक्री विधानसभा मतदारसंघातर्फे मंत्र्यांचे आभार व्यक्त केले