अवैध वाळू नेणारे 19 डंपर पकडले 

अवैध वाळू नेणारे 19 डंपर पकडले 

जळगाव - जळगाव तालुक्‍यात नदीपात्रातून उपसा करून बेकादेशीरपणे वाळू नेणारे 19 डंपर, ट्रॅक्‍टर पकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. आज प्रांताधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी जलज शर्मा, डीवायएसपी सचिन सांगळे, तहसिलदार अमोल निकम, तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर शिंपी यांनी एकत्रीतरित्या वाळू नेणाऱ्याविरूध्द मोहीमच उघडली होती. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या शुक्रवारी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना अवैधपणे वाळू उपशा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानूसार ही कारवाई करण्यात आली. 

आज सकाळपासून गिरणा नदी परिसरातून शहरासह तालुक्‍यात जाणाऱ्या विविध मार्गांवर महसूल व पोलिसांनी सापळा रचला. त्यात जो डंपर, ट्रॅक्‍टर वाळू नेताना दिसेल त्यांना पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात आणून डंपर जप्त करण्यात येत होते. दिवसभरात एकोणीस डंपर, ट्रॅक्‍टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले. 

सर्वांकडे पावत्या नाहीच 
जे डंपर, ट्रॅक्‍टर पकडण्यात आले त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वाळू उचलेल्याची पावती आढळून आली. आढळून आली मात्र ती चूकीची होती. काहींनी ठेका नसताना वाळू उचलली होती. पकडण्यात आलेले डंपर, ट्रॅक्‍टर सोडवण्यासाठी डंपर चालक, मालकांनी प्रांताधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. 

विना परवानगी वाळू नेणारे डंपर, ट्रॅक्‍टर पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आले आहे. सर्वांना दंड होईल. काहीवर गुन्हे दाखल करण्यात येतील. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही मोहीम सुरू आहे. यापूढेही सुरूच राहील. 

- जलज शर्मा, प्रांताधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com