Latest marathi news | 2 दुचाकीचोरांना बेड्या पोलिसांनी ठोकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

criminal arrested

2 दुचाकीचोरांना बेड्या पोलिसांनी ठोकल्या

विसरवाडी : खांडबारा (ता. नवापूर) परिसरातील दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. (Latest marathi news)

पोलिसांनी अधिक माहिती काढली असता, त्यांच्यावर गुजरातमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. खांडबारा येथील जयहिंदनगर परिसरातील रहिवासी राजेंद्र युवराज जगताप यांच्या मालकीची दुचाकी (जीजे १९, एस ९३६३) घराबाहेर असताना चोरट्यांनी नेली होती. श्री. जगताप यांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात ६ जुलैला तक्रार दिली होती. खांडबारा परिसरातील चोरीच्या घटनांचे वाढते व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घेऊन विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना चोरट्यांना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या.

हेही वाचा: राजकारण रोजचंच आहे पण...; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ

पोलिस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, सुरेश मोरे, प्रवीण अहिरे, योगेश्वर मराठे, मनोहर बोरसे, राजू कोकणी यांच्या पथकाने खांडबारा गावात तपासचक्र फिरवून संशयित आरोपी लक्ष्मण अशोक वळवी, राकेश दिलवर कोकणी (दोघे रा. बिजादेवी, ता. नवापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी चोरलेली दुचाकी शंकर रमेश चौधरी (रा. आश्नावा, कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात) याला विकल्याचे सांगितले. तसेच इतर तीन चोरीच्या दुचाकी सोनगड (गुजरात), करण चौफुली, नंदुरबार, रनाळे (ता. जि. नंदुरबार) येथून चोरल्याची कबुल दिली. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: राऊतांच्या आरोपाला सत्तारांंचं उत्तर, म्हणाले आम्हाला किती कोटी दिले?

Web Title: 2 Bike Thieves Arrested Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top