चाळीसगाव : गाडीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

चाळीसगाव - धुळे रस्त्यावर रात्री दीडच्या सुमारास हाँटेल संगम गार्डन जवळ अपघात झाला. चाळीसगावकडुन धुळ्याकडे भाजीपाला घेऊन जात असलेल्या पीकअप गाडीने दुचाकीला धडक दिली.

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील हाँटेल संगम गार्डन जवळ धुळ्याकडे जाणार्‍या पीकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. 

चाळीसगाव - धुळे रस्त्यावर रात्री दीडच्या सुमारास हाँटेल संगम गार्डन जवळ अपघात झाला. चाळीसगावकडुन धुळ्याकडे भाजीपाला घेऊन जात असलेल्या पीकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत शहरातील हनुमानवाडी येथील रहिवासी असलेले सौरभ शिंदे (वय 23), जयेश साळुंखे (वय 24) या दोघांचा मृत्यू झाला. हनुमानवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 dies in accident near Chalisgaon