येवला औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत दोन पॅनल आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

येवला : औद्योगिक सहकारी वसाहतीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २६ जणांचे अर्ज दाखल झाले.१३ जागांसाठी ३ जून रोजी होत असून यासाठी दोन पॅनलची बांधणी झाली असून सर्व जागावर उमेदवार आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

येवला : औद्योगिक सहकारी वसाहतीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २६ जणांचे अर्ज दाखल झाले.१३ जागांसाठी ३ जून रोजी होत असून यासाठी दोन पॅनलची बांधणी झाली असून सर्व जागावर उमेदवार आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

मागील निवडणुकीत बारा जागा बिनविरोध झाल्या होत्या तर पुढे अडीच वर्षातच वसाहतीवर प्रशासक नेमल्याने येथील टोकाचे राजकारण चांगलेच चर्चेला आले होते.यामुळेच पुन्हा निवडणूक जाहीर झाली आहे.आज गुरुवार अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राजकीय ओठाताण व गटबाजीतून विविध गटातील १३ जगांसाठी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.या निवडणुकीसाठी जेष्ठ नेते अंबादास बनकर,पुरुषोत्तम काबरा,विक्रम गायकवाड आदींच्या पुढाकारातून एक तर माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी,लाला कुक्कर,अजय जैन आदींच्या पुढाकारातून दुसरा पनल तयार झाला आहे. यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली असून आगामी राजकी घडामोडी लक्षवेधी ठरणार आहे.

कारखानदार मतदारसंघ गटातील सात जागांसाठी चारुशीला पुरुषोत्तम काबरा, मुकेश चवळे, अरुण भावसार, सुकृत पाटील, विष्णू खैरनार, शाम कंदलकर, विनोद कंदलकर, चोथमल छतानी, सतीशकुमार छतानी, अनिल कुक्कर, अंबादास बनकर, अजय जैन, भोलानाथ लोणारी या तेरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोसायटी मतदार संघ गटातून एका जागेसाठी सुवर्णा चव्हाण, प्रवीण पहिलवान या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वैयक्तिक राखीव पाच जागांसाठी विविध गटातून ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव गटातील दोन जागांसाठी सुचित्रा सुदाम पाटील, अस्मिता विक्रम गायकवाड, मुटत रोसी जिम्मी, जयश्री रामदास काळे यांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

अनुसूचित जाती/जमातीच्या एका जागेसाठी योगेंद्र वाघ व मुकेश चवळे यांनी तर इतर मागासवर्गाच्या एका जागेसाठी दत्तकुमार महाले,नितीन आहेर,सुनील पैठणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटाच्या एका जागेसाठी अॅड. नवीनचंद्र परदेशी व  गंगाधर लोणारी याचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी योगेश उगलमुगले,सहायक सोपान पैठणकर यांनी दिली.

आता उद्या नामनिर्देशनपत्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ११ ला नामनिर्देशनत्राची छाननी, १४ रोजी वैध नामनिर्देशनत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ मे पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार असून यानंतर उमेदवारंना निशाणी वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: 2 panel fights in election on yeola industrial area