अन् त्यांनी काढुन दिल्या दोन दुचाक्या आणि चार चाकू!

दीपक कच्छवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक यांच्यावर खुनी हल्ला करून पाचही संशयितांनी पोबारा केला होता.या प्रकरणी सहा तासातच तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.यातिल दोन संशयित आरोपींना पोलिसांनी नुकतीच अटक केली असुन या पाचही संशयीत आरोपींनी गुन्ह्य़ाची कबुली देत दोन मोटरसायकल व चाकु पोलिसांनी जप्त केला आहे. 

उंबरखेडे - देवळी रस्त्यावर 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र बॅकेच्या व्यवस्थापक अभिजीत काळकर  व कॅशीयर स्वप्नील देवकर या दोघांना 5 दरोडेखोरांनी उंबरखेडे - रस्त्यावर अडवले जबरीने बॅग हिसकावत अभिजीत काळकर यांच्यावर चाकूने वार करून  जखमी केले होते.यावरुन संशयित पाचही दरोडेखोरांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सहा तासात  गुन्हा उघडकीस आणुन पाच आरोपींपैकी  समाधान रामदास म्हस्के,) वसंत राजु बच्छाव, दोन्ही रा. चाळीसगाव, साहेबराव उर्फ सायबु विक्रम कोळी (रा उंबरखेडे) यांना अटक  केली होती.या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार झाले होते.

दोघांना अटक
मेहुणबारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत यातील दोन्ही फरार संशयित आरोपींना ता. डिसेंबर रोजी खुशाल उर्फ गौरव देवकर ; रवि उर्फ भोला पांचाळ दोन्ही राहणार  (हरीगीरबाबा नगर, चाळीसगाव) यांना अटक करत पाचही संशयित आरोपींची न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती.या पाचही संशयितांची श्री हिरे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखे बोलु लागले.या सर्वानी गुन्ह्याची कबुली दिली.तसेच गुन्ह्यांत वापरलेल्या दोन मोटार सायकल, चार चाकु काढुन दिले.

हल्लेखोर सराईत गुन्हेगार 
गंभीर गुन्ह्यातील सर्व आरोपींना मेहुणबारे पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात अटक केली असून   संशयित आरोपी हे  सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला खुन, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: 2 two wheeler and knife seized