माशांच्या जाळ्यामुळे 20 पक्ष्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नाशिक - नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात अवैध मासेमारीच्या समस्येने डोकेवर काढले आहे. माशांच्या जाळ्यात गुरफटून वीस पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये स्थलांतरीत कॉमन क्रेन पक्षाचा नाहक बळी जातो आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गाईडच्या मदतीने काही पक्ष्यांची सुटका केली.

राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक पक्ष्यांनी नांदूरमधमेश्‍वर अभयारण्यात मुक्काम ठोकला आहे. इथे दहा हजारांहून अधिक पक्ष्यांचे दर्शन घडते. पाणी कमी झाल्याने पक्ष्यांना खाद्य मोठ्याप्रमाणात उपलब्ध झाल्याने फ्लेमिंगो, कॉमन क्रेनसारखे पक्षी शेकड्याने इथे आले आहेत. पक्षी जाळ्यात अडकल्याचे दुर्बिणीतून दिसल्यावर त्याला वाचविण्यासाठी गाईड शंकर लोखंडे हे धरणात उतरले होते. ते आतमध्ये गेल्यावर त्यांना तीसहून अधिक जाळी पाह्यला मिळाळी. अनेक पक्षी त्यामध्ये गुरफटलेले त्यांना दिसले. त्यानंतर दुपारी तीनला सुरू झालेले हे "रेस्क्‍यू ऑपरेशन' सायंकाळी सातपर्यंत सुरु होते. जाळ्यांमध्ये मृत्यु झालेल्या पक्ष्यांमध्ये डारटर, कुट, पान कावळा अशा पक्ष्यांचा समावेश होता. जाळ्यात अडकलेल्या तीसहून अधिक पक्ष्यांना वाचवण्यात यश आले.

Web Title: 20 Bird Death by Fish Nest