नाशिकमध्ये एकाच दिवशी २० पक्ष्यांवर ‘संक्रांत’

नाशिकमध्ये एकाच दिवशी २० पक्ष्यांवर ‘संक्रांत’

नाशिक - नायलॉन मांजावरील निर्बंधाची बरीच चर्चा झाली. पोलिसांनी इमारतींच्या गच्चीवर जाऊन तपासणी केली, पण तरीही उंच आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगांसाठी मांजा वापरण्यावर अंकुश लागला नाही. परिणामी पतंगोत्सवाच्या एकाच दिवशी २० पक्ष्यांवर ‘संक्रांत’ आली. त्यात कबुतरांचे प्रमाण जास्त आहे. पक्षिमित्रांनी गलोल जमा केल्या आहेत.

शहराप्रमाणेच ग्रामीण भागात नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी झाले. शहरात नेचर क्‍लब ऑफ नाशिक, मंगलरूप गोशाळा आणि पुरुषोत्तम आव्हाड, गंगाधर अघाव, शंकर लोखंडे, गौरव क्षत्रिय, शेखर गायकवाड, शरण्या शेट्टी, शरद पांडे, विशाल बाफना, देविका भागवत आदी पक्षी व सर्पमित्रांनी जखमी पक्ष्यांवर औषधोपचार करण्यास मदत केली. पंचवटी, गंगापूर रोड, कॉलेज रोड, गोविंदनगर, सिडको या भागांत जखमी पक्षी आढळले. 

जखमी पक्ष्यांची संख्या
कबुतर- आठ
घुबड, कावळा- प्रत्येकी दोन 
किंगफिशर, पोपट, नाइट हेरॉन, शराटी, शिक्रा, बुलबुल, डव, गाय बगळा- प्रत्येकी एक

जखमी पक्ष्यांच्या केंद्राचा अभाव
वन विभागाने गस्तीपथकाबरोबरच जखमी पक्षी ठेवण्यासाठी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, तशी व्यवस्था नसल्याने पक्षिमित्र स्वखर्चाने पक्ष्यांना बरे करत सोडून देतात. मुळातच जनजागृतीप्रमाणे पक्ष्यांच्या रक्षणाची व्यवस्था करण्याऐवजी वन विभाग पक्षिमित्रांवर जबाबदारी सोपवून नामानिराळे होत नाहीत ना, असा प्रश्‍न या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

लटकलेला मांजा काढावा
नायलॉन मांजामुळे झालेल्या जखमा मोठ्या नसल्याने प्रथमोपचार करून पक्ष्यांना लगेच सोडून देण्यात आले. शहरात मांजा अनेक ठिकाणी झाडे, तारांवर लटकलेला पाहावयास मिळतो. तो कुजत नसल्याने वर्षभर लटकलेला असतो. या समस्येमुळे पक्षी जखमी होतात. त्यामुळे महापालिकेने मोहीम राबवून लटकलेला मांजा काढावा, अशी अपेक्षा पक्षिमित्रांची आहे. त्याचप्रमाणे नाशिकच्या बुधवारच्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात गलोल विक्रीसाठी येतात. त्याची व्यवस्था लावणे पक्षिमित्रांना आवश्‍यक वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com